Project K Trailer Release  Dainik Gomantak
मनोरंजन

Project K Trailer Release : प्रभास आणि दिपीकाच्या प्रोजेक्ट K चा ट्रेलर रिलीज, चित्रपटाचे नावही बदलले

अभिनेता प्रभास आणि दिपीका पदुकोनच्या मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट K चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

'बाहुबली' फेम प्रभास सध्या चर्चेत आहे. त्याच्या 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचा टीझर आणि शीर्षक दोन्ही रिलीज झाले आहेत. 21 जुलै रोजी सकाळी यूट्यूबवर चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना चांगली बातमी मिळाली. यामध्ये देशाच्या सर्वनाशाच्या वेळी एक योद्धा कसा मसिहा बनून सर्वांना वाचवतो याची कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटाचे नाव बदलले

सध्या इंडस्ट्रीत 'प्रोजेक्ट के'ची चर्चा जोरात आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि प्रभास स्टारर सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. आणि आता त्याच्या टीझरद्वारे खरे नावही समोर आले आहे. या चित्रपटाच्या खऱ्या शीर्षकाची अधिकृत घोषणा अमेरिकेतील सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेंटमध्ये करण्यात आली. 

आता या चित्रपटाचे नाव 'प्रोजेक्ट के' नसून 'कल्की 2898 एड' असेल. याशिवाय या चित्रपटाच्या टीझरमध्ये बरेच काही दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे चाहत्यांना चित्रपटाच्या कथानकाची कल्पना आली आहे.

6 तासात 1.6 मिलीयन व्ह्यू

साय-फाय अॅक्शन चित्रपट 'प्रोजेक्ट के'चे नाव आता 'कल्की 2898 एडी' असे ठेवण्यात आले आहे. आधी 20 जुलैला अमेरिकेत आणि आता 21 जुलैला सकाळी भारतात या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली. 

यूट्यूबवर आलेला त्याचा टीझर 6 तासांत 1.6 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. मेकर्सने सुरुवातीला त्याचे अनेक पोस्टर्स आणि दीपिकाचा फर्स्ट लुक रिलीज केला होता. जे चाहत्यांना विशेष आवडले नाही. मात्र आता टीझर रिलीज करून चित्रपटाची कथा समोर आली आहे.

भगवान विष्णुच्या आधुनिक अवताराची गोष्ट

नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात भगवान विष्णूच्या आधुनिक अवताराची कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर पाहिला तर त्यात हत्याकांडाची कथा दिसते. जगात सर्वत्र अंधाराचे राज्य आहे. लोकांना कैद केले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोकांना उपाशी ठेवले जात आहे.

पाणीही मिळत नाही. त्याचवेळी एका मोठ्या खोलीत शिवलिंगही दिसते. पण कोणत्याही प्रकारची पूजा नाही. मात्र, कुणाच्या तरी हातात हनुमानजींची छोटी मूर्तीही दिसते. लोकांना परमेश्वराची आठवण होताच प्रभास संरक्षकाच्या भूमिकेत दिसतो.

जेव्हा जग अंधारात व्यापेल तेव्हा...

टीझरमध्ये लिहिलेल्या ओळींनुसार, जेव्हा अंधार जग व्यापेल तेव्हा एक शक्ती उदयास येईल. शेवट आता सुरू होतो. जिथे दीपिका आर्मी जॉईन करताना दिसत आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले दिसत आहेत. त्याचे फक्त डोळे दिसतात. त्याचवेळी प्रभासचाही योद्धा म्हणून प्रवेश होतो. तो जगाला वाचवण्यासाठी येतो. येथे असे म्हणता येईल की ज्या प्रकारे कलियुगात अत्याचार शिगेला पोहोचतील आणि त्यानंतर भगवान कल्की अवतरतील. तसेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT