Sameer Wankhede Suspension
Sameer Wankhede Suspension Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Suspension : आर्यन खान प्रकरण भोवणार...समीर वानखेडेंच्या निलंबनाची शक्यता

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन क्रूजवरील ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याचं प्रकरण एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना चांगलंच जड जाऊ शकतं. सुत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी समीर वानखेडे यांचं निलंबन होऊ शकतं

गेले काही दिवस आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे. आर्यन खानला दोन वर्षांपूर्वी त्याच्या काही मित्रांसोबत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. यात मॉडेल मुनमुन धमेचा हिचाही सहभाग होता.

धक्कादायक...कारवाईवेळचं सीसीटिव्ही फूटेज नाहीच

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर जेव्हा क्रूजवर अटकेची कारवाई झाली तेव्हा त्यावेळचे सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सध्या समीर वानखेडे CBI च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणातले काही जबाब बघता समीर वानखेडे यांच्याकडे संशयाची सुई जाते. त्यातच आता समीर वानखेडे यांचं निलंबन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूजा ददलानीचा जबाब...

पूजा ददलानीने तिच्या रेकॉर्ड केलेल्या जबानीत कथित खंडणी स्वीकारली आहे. या प्रकरणात त्याने टोकन मनी म्हणून 50 लाख रुपयांची बॅग दिल्याचेही सांगण्यात येत आहे. इतकेच काय, हे सर्व कॉर्डेलिया क्रूझच्या छाप्याच्या काही तासांनंतरच घडले. 

एनसीबीच्या तपासानुसार, या प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आले तेव्हा अधिकाऱ्याकडून 25 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र नंतर 18 कोटी रुपयांत सौदा ठरला. त्यासाठी टोकन मनी म्हणून ५० लाख रुपयेही देण्यात आले

पूजासह आणखी काही जणांचे जबाब

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार तपासात सहभागी असलेल्या एका प्रमुख अधिकाऱ्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, "दक्षता पथकाने गेल्या वर्षी पूजा ददलानीशी संपर्क साधला, त्यानंतर तिने खंडणीच्या आरोपांबाबत तिचे म्हणणे नोंदवले." पूजाशिवाय केपी गोसावी, सॅनविले डिसोझा आणि प्रभाकर साईल (साक्षीदार) यांचेही जबाब आम्ही नोंदवले.

शाहरुखकडून लाच घ्यायची होती

या अधिकाऱ्याला पूजा ददलानीने तिच्या वक्तव्यात काय म्हटले आहे, असे विचारले असता, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. तथापि, ते पुढे म्हणाले की, सर्व विधानांच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला की शाहरुख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते

मुलाच्या सुटकेसाठी शाहरुखची विनंती

शाहरुखने माझ्याकडे मुलाच्या सुटकेची विनंती केली होती असं आपल्या याचिकेत सांगत समीर वानखेडे यांनी शाहरुखसोबत झालेले व्हॉट्स अप चॅटही कोर्टात दाखल केले होते. हे चॅट कोर्टात सादर करताना वानखेडे यांनी आपण यात कुठेच पैशाची मागणी केली नाही असं सांगितलं.

CBI ने काल (19मे ) शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब घेतला त्यात तिने शाहरुखकडे वानखेडे यांनी 15 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यातले 50 लाख रुपये शाहरुखने दिले होते असा धक्कादायक खुलासा केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

SCROLL FOR NEXT