Rakshita Suresh Dainik Gomantak
मनोरंजन

Rakshita Suresh : पोन्नियिन सेल्वन मधलं हे गाणं गायलेल्या गायिकेचा मोठा अपघात...कार डिव्हायडरला धडकली अन्

साऊथच्या प्रसिद्ध गायिकेचा अपघात झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.

Rahul sadolikar

पोन्नियन सेल्वन या सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटाची गायिका रक्षिता सुरेश हिचा अपघात झाला आहे. साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका रक्षिता सुरेश हिचा मोठा अपघात झाला आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये गाणारी रक्षिता हिचा मलेशियामध्ये भीषण अपघात झाला. तिची कार दुभाजकाला धडकली. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ती सध्या मलेशियामध्ये असून रविवारी तिचा अपघात झाला.

एआर रहमानसोबत 'पोन्नियिन सेल्वन 2' मधील गाण्यांला रक्षिता सुरेशने आवाज दिला आहे. त्यासंदर्भात पोस्ट शेअर करत तिने तिच्यासोबत झालेल्या अपघाताची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

त्यात तिने लिहिले की, अपघातानंतर तिचे संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर फिरू लागले. 7 मे 2023 रोजी सिंगरने पोस्टमध्ये लिहिले, “आज माझा एक मोठा अपघात झाला. मी सकाळी मलेशियातील विमानतळावर जात असताना प्रवास करत असलेली कार डिव्हायडरला धडकली आणि रस्त्याच्या कडेला पडली. त्या 10 सेकंदात माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आलं."

पुढे ती लिहिते, "एअरबॅग्जमुळे आम्ही वाचलो. नाहीतर गोष्टी आणखी बिघडू शकल्या असत्या. घडलेल्या प्रकारामुळे आम्ही घाबरलो आहोत आणि इतर सहप्रवासी सुरक्षित आहेत. सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आम्ही वाचलो."

रक्षिता सुरेशने ' पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये किरुनागे हे एक गाणे गायले आहे. रक्षिता सुरेशने 2009 मध्ये लिटिल स्टार सिंगर रिअॅलिटी शो जिंकला होता. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT