Ponniyin Selvan 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Ponniyin Selvan 2 Box Office Collection : पोन्नियन सेल्वन तमिळ फिल्म इंडस्ट्रीला उभारी देणार? पहिल्या दिवसाची इतकी कमाई...

Rahul sadolikar

दिग्दर्शक मणीरत्नम यांचा पोन्नियन सेल्वन हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज झाला . चला जाणुन घेऊया चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? 2023 हे वर्ष भारतीय चित्रपट उद्योगासाठी तुलनेने चांगले वर्ष ठरले आहे.

जवळजवळ प्रत्येक इंडस्ट्रीने काही मोठे हिट्स दिले आहेत. बॉलीवूडनेही पठाणसोबत 1000 कोटींची कमाई केली आहे. पण तमिळ उद्योग या वर्षातही फारसे काही देऊ शकले नाही. वारिसू आणि थुनिवू सारखे मोठे चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकले नाहीत.

आता तमिळ उद्योगाने आपल्या सर्व आशा मणिरत्नमच्या ऐतिहासिक कालखंडातील ड्रामा, पोन्नियिन सेल्वन 2 वर लावल्या आहेत. पोन्नियन सेल्वनच्या पहिल्या भागाने तमिळनाडूमध्ये प्रचंड व्यवसाय केला आणि तो एक बिग हिट म्हणून समोर आला होता, पण, इतर भाषांमध्ये चित्रपट अयशस्वी झाला होता.

सहसा, यशस्वी चित्रपटाचा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर अधिक चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा केली जाते कारण आधीच सेट झालेल्या ब्रँडमुळे अधिक प्रमोशन केलं जातं. पण ट्रेंडनुसार, PS 2 ची कमाई पहिल्याच्या तुलनेत वेगवान होताना पहिल्या दिवशी दिसली नाही.

पहिल्या भागाच्या तुलनेत केवळ तामिळ राज्यांमध्येच नव्हे तर यूएसमध्येही बुकिंग कमी आहे. गंमत म्हणजे इंडस्ट्रीत चर्चा अशी आहे की पहिला भाग फारसा मनोरंजक नव्हता आणि त्यामुळे त्याच्या सिक्वेलसाठी फारसा उत्साह नाही.

‘PS-2’ ने रिलीजआधीच ७.६ कोटी रुपयांची अॅडव्हान्स तिकिटं विकली होती. तर, पहिल्या भागाची अॅडव्हान्स बूकिंग १६ कोटी रुपयांची झाली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, फिल्म बिझनेस एक्स्पर्ट रमेश बाला यांनी सांगितल्याप्रमाणे PS-2 ची तुलना केजीएफ: चाप्टर २ किंवा बाहुबली २ शी करणं योग्य होणार नाही.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या अंदाजांनुसार, चित्रपटाचा फर्स्ट डे चांगला गेला ‘PS-2’ने देशांतर्गत कलेक्शन ३२ कोटी रुपये इतके केले. या चित्रपटाचे सर्वात जास्त कलेक्शन तमिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या भागाच्या तुलनेत पहिल्या भागाची कमाई पाहिली तर भारतात पहिल्या दिवशी ३४ कोटी रुपये आणि जगभरात ८० कोटी रुपयांची कमाई केली होती. PS च्या दुसऱ्या भागाची कमाई पहिल्याच्या तुलनेत दोन कोटी रुपयांनी कमी आहे.

तमिळ प्रेक्षकांमध्ये मोठ्या पडद्यावर त्यांच्या चोळांचा तेजस्वी इतिहास पाहणे एक अभिमानाची .भावना असल्यामुळे पहिल्या भागाने मोठा व्यवसाय केला. पण आता अशी उत्सुकता राहिलेली नाही आणि PS 1 मधील कंटाळवाणा स्टोरी टेलिंगने त्याचा दुसरा भाग पाहण्याची प्रेक्षकांमधील उत्सुकता संपवली आहे असंही म्हटलं जात आहे.

आता सर्वांच्या नजरा त्याच्या प्रीमियर शोमधून निर्माण होणाऱ्या सार्वजनिक चर्चेकडे आहेत. जर चर्चा अत्यंत सकारात्मक ठरली, तर PS 2 ला बॉक्स ऑफिसवर काही संधी आहे, अन्यथा हा तमिळ फिल्म इंडस्ट्रीला एक मोठं नुकसान देऊन जाईल हे नक्की कारण हा चित्रपट इंडस्ट्रीतला अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT