Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायला नोटीस..., काय आहे अमिताभ बच्चन यांचा संबंध

Aishwarya Rai Bachchan: 22 हजारांचा टॅक्स न भरल्यामुळे ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली आहे.
Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai BachchanDainik Gomantak
Published on
Updated on

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आता मात्र ऐश्वर्या राय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 22 हजारांचा टॅक्स न भरल्यामुळे ऐश्वर्या रायला सिन्नर तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली आहे.

नाशिकमधील सिन्नरमध्ये पवनऊर्जा कंपनीत एका वितरण कंपनीत ऐश्वर्या रायची गुंतवणुक आहे. आयकर बचत करण्यासाठी सुजलोन पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत अनेक कलाकारांनी गुंतवणूक केल्या आहेत. ही कंपनी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या जमीनीवर आहे.

सिन्नरमधील ठाणगावजवळ आडवाडी भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्यासोबतच इतरही 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ती अडचणीत सापडल्याचे म्हटले आहे.

अशीच घटना 2005 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झाली होती. अमिताभ बच्चन यांनादेखील टॅक्स न भरल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना ते शेतकरी आहेत की नाही याबाबत स्पष्टीकरण द्यायला लागले होते.

Aishwarya Rai Bachchan
Jawed Akhtar: गीतकार म्हणून असे घडले जावेद अख्तर

दरम्यान , मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. थकबाकीदारांत बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा. लि., मेटकोन इंडिया प्रा. लि., छोटाभाई जेठाभाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लिमिटेड, एल बी कुंजीर इंजिनिअर, एस. के. शिवराज, आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट प्रा. लि., कुकरेजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात( Gujrat ), रामा हँडिक्राफ्ट, अल्ग्रो व्हेंचर्स लिमिटेड अशा कंपन्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com