Pitchers Season 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Pitchers Season 2 Trailer: पिचर्स सिझन 2 चा ट्रेलर रिलीज पण जीतु भैय्या ट्रेलरमध्ये नाही..

पिचर्स सिझन 2 चा ट्रेलर रिलीज झाला पण त्यात जीतु भैय्या न दिसल्याने फॅन्स नाराज झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

फायनली त्या फॅन्सची प्रतीक्षा संपली आहे जे पिचर्स च्या सेकंड सिझनची आतुरतेने वाट बघत होते. प्रसिद्ध वेब सिरीज पिचर्स सिझन 2 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला पण त्यात आपला लाडका जीतु भैय्या म्हणजेच जितेंद्र कुमार नदारद (Jitendra Kumar) न दिसल्याने फॅन्स नाराज झाले आहेत.

तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हा सिझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिझनमध्ये काही नवीन कॅरेक्टर्स पहायला मिळणार आहेत. पण फॅन्स मात्र आपल्या लाडक्या जीतु भैय्याला शोधत राहिले कारण या ट्रेलरमध्ये जीतु भैय्या काही दिसला नाही.

जीतु या कॅरेक्टर मुळे अभिनेता जितेंद्र कुमार नदारद याला एक वेगळी ओळख मिळाली होती. ही वेब सीरीज जितेंद्रच्या फॅन्ससाठी खुप जवळची आहे.

या सिझनमध्ये पुन्हा त्या मित्रांची गोष्ट दाखवली जाणार आहे जे नोकरी करतात पण काही वेगळं करण्याची त्यांची इच्छा आहे. रिस्क घेण्याच्या नादात त्यांना बरंच काही गमवावंही लागतं.

या सिझनमध्ये पुन्हा आपल्याला या मित्रांच्या रिस्क, फेल्युअर, सक्सेस यांची गोष्ट बघायला मिळाली होती. सोबतीला कॉमेडीचा तडका होताच.

मागच्या सिझनमध्ये आपल्याला नवीन, अभिषेक, जीतेंद्र ,अभय महाजन आणि अरुणभ कुमार हे मुख्य भुमिकेत दिसले होते. या पाचही जणांचा दमदार अभिनय फॅन्सनी डोक्यावर घेतला होता. हे पाचही मित्र नवीन स्टार्ट-अप करणार असतात पण कित्येकदा त्यांच्यात इमोशनल ब्रेकडाउन येतं पण तरीही त्यांचा संघर्ष सुरू राहतोच. आता नव्या सिझनमध्ये काय पहायला मिळणार आहे याची फॅन्समध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

23 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर ही वेब सिरीज झी फाईव्ह या ओटीटी प्ल्ॅटफॉर्मवर बघायला मिळेल.

या वेब सीरीजमध्ये 'एस्पिरेंट्स' फेम नवीन कस्तूरिया, अभय महाजन, 'स्त्री' फिल्ममध्ये भाव खाऊन गेलेला अभिषेक बॅनर्जी, टीवी अॅक्ट्रेस रिद्धि डोगरा, सिकंदर खेर, गोपाल दत्त, आशीष विद्यार्थी, रोंजिनी चक्रवर्ती ही तगडी स्टारकास्ट बघायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT