Kareena Kapoor and Saif Ali Khan's son Jeh  Instagram/@kareenakapoorkhan
मनोरंजन

रक्षाबंधनच्या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळाली 'जेह' झलक

करीना कपूरचा मुलगा जेह त्याची बहीण इनायासोबत पहिले रक्षाबंधन (Raksha Bandhan) साजरे करताना दिसला

दैनिक गोमन्तक

करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या लहान मुलाला मीडिया समोर फारसे येऊन दिले नाही. मात्र पहिल्या रक्षाबंधनच्या निमित्ताने जेहचा (Jeh) फोटो पुन्हा एकदा समोर येत आहे. पहिलं रक्षाबंधन (Raksha Bandhan) सेलिब्रेट करताना सोबत त्याची बहीण इनाया आपल्याला फोटोमध्ये बघायला मिळत आहे.

सोहा अली खानने करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा (Saif Ali Khan) धाकटा मुलगा जेह याचा इनायासोबत एक फोटो रक्षाबंधनच्या निमित्ताने शेअर केला आहे. करीना कपूरचा मुलगा जेह हा त्याची बहीण इनायासोबत पहिला रक्षाबंधन साजरा करताना बघायला मिळतोय. सैफ आणि करीनाच्या कुटुंबाने यावर्षी रक्षाबंधन थोडे उशिरा साजरे केले कारण सैफचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे कुटूंब मालदीवमध्ये होते. गेल्या सोमवारी सैफ अली खान हा 51 वर्षांचा झाला असून त्याने करीना आणि त्यांच्या दोन मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. याच प्रसंगाचा फोटो करीनाने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

सोहा अली खानने सुद्धा मंगळवारी इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये इनायाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, तर जेहने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. फोटोमध्ये, इनाया आणि जेह पहिल्यांदा एकत्र समोर आले आहेत, सोहा आणि कुणाल केमूच्या मुलीने जेहला किस करतानाचा हा फोटो आहे.

सोहाने "पहिली राखी (ब्लू हार्ट इमोजी)" हे कॅप्शन देऊन हा फोटो शेअर केला सोबतच करीनाला सुद्धा टॅग केले. सोहाने करिना आणि सैफचा मोठा मुलगा तैमूरला राखी बांधताना तिच्या मुलीचा फोटो शेअर केल्या नंतर. फोटोमध्ये तैमूर सैफच्या मांडीवर बसला आहे तर इनाया सोहाच्या मांडीवर बसली आहे. तिने bund togather हा कॅप्शन देऊन आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिने करीनाला टॅग केले आणि मेंशन केले की तिला सबा अली खान, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांची आठवण येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT