Pathan's Impact on Other film Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan :'सेल्फी' आणि 'शेहजादा'चे शो रद्द करून त्याजागी पठाण'चे शो?

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा फटका त्याच काळात रिलीज झालेल्या दोन चित्रपटांना बसला आहे.

Rahul sadolikar

Pathan's Impact on Other film अभिनेता शाहरुख खानचा पठाण रिलीज होऊन महिना उलटून गेला तरीही अजुन शाहरुख आणि पठाण दोन्हींची क्रेज कमी झाली नाही. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. रिलीज होऊन 37 दिवस उलटूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या मॅरेथॉनच्या वेगाने पठाणने त्याच्याबरोबरच्या सगळ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

कार्तिक आर्यन स्टारर 'शेहजादा' आणि अक्षय कुमार-इमरान हाश्मीचा 'सेल्फी' चित्रपटगृहांमध्ये फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळेच शहजादा आणि सेल्फीचे शोही थिएटरमधून पठाणला दिले जात आहेत.

G7 मल्टिप्लेक्स आणि मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "सेल्फी" आणि "शेहजादा" चा जोर ओसरला आहे. दोन्ही चित्रपटांचे सर्व शो मी मराठा मंदिर येथे 'पठाण' ने बदलले आहेत आणि लवकरच ते Gaiety-Galaxy मल्टिप्लेक्समध्ये करेन.

 प्रेक्षक अजूनही चित्रपट पाहण्यासाठी येत असल्याने मी 'पठाण'च्या तिकिटाचे दरही कमी केले आहेत. तर 'सेल्फी' आणि 'शेहजादा'साठी क्वचितच प्रेक्षक दिसत आहेत.

देसाई पुढे म्हणाले, 'सेल्फी'ने गेल्या आठवडाभर आम्हाला रडवले. आम्ही आता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत तू झुठा मैं मक्करच्या रिलीजची वाट पाहत आहोत. राज मेहताच्या 'सेल्फी'ने सात दिवसांत 14.68 कोटींची कमाई केली आहे.

'शेहजादा'ने दोन आठवड्यांत 30.55 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे 'पठाण'ने इंडियन बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 503 कोटींची कमाई केली आहे. पठाणचा बोलबाला आणि प्रेक्षकांची साथ या जोरावर आतापर्यंत एक हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT