Parineeti Chopra-Raghav Chadha Dainik Gomantak
मनोरंजन

Parineeti Chopra-Raghav Chadha: लगीन घटिका आली! परिणीती अन् राघवच्या लग्नाचा मुहुर्त ठरताच सुवर्णमंदिरात झाले नतमस्तक

Parineeti Chopra: बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रातून अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत परिणीती आणि राघवसाठी आनंद व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Parineeti Chopra: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. परिणीती आणि राघव इंडस्ट्रीमधील नवीन कपल आहेत. दोघांनी आपल्या नात्यावर बराच काळ भाष्य केले नव्हते.

मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांनी साखरपुडा केला आहे. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि परिणीतीची बहिण प्रियंका चोप्राने या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

आता राघव आणि परिणीती अमृतसरच्या सुवर्णमंदीरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. दोघे पांढरे कपड्यात सुंदर दिसत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव उदयपूरवरुन परत येताना दिल्ली एअरपोर्टवर दिसले होते. ते लग्नासाठी डेस्टिनेशन शोधत असल्याचे म्हटले जात आहे. परिणीती आणि राघव यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, याआधी परिणीती चोप्राची बहिण आणि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोप्रानेदेखील उदयपूरमध्ये निक जोनससोबत शाही विवाह केला होता. परिणीती आणि राघवने आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करण्याआधी अनेकदा ते सोबत दिसून आले होते, मात्र दोघांनीदेखील आपल्या नात्यावर भाष्य करणे टाळले होते.

अनेक वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र असून आता आपल्या नात्याला पुढे नेताना दिसत आहे. बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रातून अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत परिणीती आणि राघवसाठी आनंद व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT