Raghav Chaddha - Pareeniti  Dainik Gomantak
मनोरंजन

राघव - परिणिती चढणार बोहल्यावर, या दिवशी वाजणार सनई -चौघडे ..

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खा. राघव चढ्ढा यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला..

Rahul sadolikar

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे युवा नेते खा. राघव चढ्ढा यांच्या लग्नाची बातमी नुकतीच समोर आली असुन या दिवशी दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. दोघेही 25 सप्टेंबरला राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत. राजस्थानमध्ये सात फेऱ्या कुठे होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या परिणीतीची टीम अॅक्शन मोडमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहे.

अखेर तो दिवस निश्चित

परिणीती चोप्राचे चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आला आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचा दिवस निश्चित झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी दोघे लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा यांची 13 मे 2023 रोजी दिल्लीत एंगेजमेंट झाली. आता या वर्षी ते लग्न करणार आहेत.

परिणितीने गुप्तता पाळली

एका स्रोताने ETimes ला सांगितले की हे एक मोठे लग्न असेल. परिणीती चोप्राच्या टीमने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 

परिणिती तिच्या लग्नाचे कोणतेही डिटेल्स कोणाशीही शेअर करत नाहीये. तिने सर्व काही गुप्त ठेवले आहे. लग्नाचे सर्व विधी परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या कुटुंबियांमध्ये होणार आहेत.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नाची तयारी...

सूत्राने असेही जोडले की परिणीती चोप्रा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या लग्नाची तयारी करेल. हे लग्न राजस्थानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन होणार आहे. याबाबत ETimes ने परिणीतीशी संपर्क साधला असता, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

परिणितीचा आगामी चित्रपट

परिणीती सध्या अक्षय कुमारसोबत 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर दोघेही खूप जुने मित्र आहेत. पण 2022 पासून त्यांच्यातील जवळीक वाढली.

 परिणिती पंजाबमध्ये 'चमकिला' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यानंतर राघव चढ्ढा परिणीतीला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. तेव्हाच दोघांनाही एक नातं जाणवलं आणि मग प्रेम झालं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT