Gadar Collection Day 8 : 22 वर्षांनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर चित्रपटाची एक जबरदस्त कथा आणली आणि देशभरातल्या प्रेक्षकांना वेड लागले. गदर एक प्रेम कथा या चित्रपटाच्या पहिल्या भागाला त्यावेळी लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते, तर त्याचा गदर २ हा भाग लोकांना पूर्वीपेक्षा जास्त आवडला आहे. पहिल्या आठवड्याच्या दमदार कामगिरीनंतर, चित्रपट आता 350 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हिट्सचे तुफान निर्माण केले आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 'तारा सिंह'मध्ये सनी देओलला त्याच जुन्या अॅक्शन आणि भारदस्त स्टाइलमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांसाठी 'गदर'च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पहिल्या ओपनिंग आठवड्यात यशस्वी कमाई केल्यानंतर 'गदर 2' ने 300 कोटींचा गल्ला जमवून दुसऱ्या आठवड्यात सुरुवात केली आहे.
'गदर 2 ' हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वात कमी कलेक्शन केले असले तरी, तरीही तो 300 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. आठ दिवसांत हा आकडा पार करणारा 'गदर 2' हा 12 वा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
सुरुवातीच्या अंदाजानुसार, सनी देओल , अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा अभिनीत 'गदर 2' ने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी 18 ते 20 कोटींचा निव्वळ कलेक्शन केला आहे. या अर्थाने चित्रपटाने एकूण 302.64 कोटींचा गल्ला जमवला आहे. गदर 2 च्या आठव्या दिवसाच्या कलेक्शनची तुलना यावर्षीच्या सर्वाधिक ओपनर चित्रपट 'पठाण'शी केली तर शाहरुख खानच्या चित्रपटाने आठव्या दिवशी हिंदीत 17.5 कोटींचा व्यवसाय केला.
'गदर 2' हा सनी देओलचा पहिला चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे, ज्याने एकाच वेळी 100, 200 आणि 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल वयाच्या 65 व्या वर्षी 100 कोटींची कमाई करणारा पहिला बॉलिवूड अभिनेता बनला आहे.
दुसरीकडे, चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
'गदर 2'च्या यशानंतर चाहत्यांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. नुकतेच सनी देओलने ' गदर 3 ' बद्दल मोठे संकेत दिले आहेत . पापाराझीने त्याला गदर 3 बद्दल विचारले, ज्याच्या उत्तरात त्याने सांगितले की तिसरा भाग नक्कीच येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.