Pakistani singer Arooj Aftab wins Grammy Award Dainik Gomantak
मनोरंजन

Grammy Awards: अरुज आफताब ठरली पहिली पाकिस्तानी महिला ग्रॅमी विजेती

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने आफताबला ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

Grammy Awards 2022: पाकिस्तानी गायक अरुज आफताबने 64 व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये इतिहास रचला आहे. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी अरुज पहिली पाकिस्तानी महिला ठरली आहे. मोहब्बत या गाण्यासाठी अरुज आफताबला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीत हा पुरस्कार मिळाला आहे. (Pakistani singer Arooj Aftab wins Grammy award)

ग्रॅमीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही बातमी देण्यात आली. 'अरुज आफताबच्या 'मोहब्बत' ला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स 2022 चा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. आफताब ही ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली पाकिस्तानी महिला (Woman) आहे.' पुरस्कार जिंकल्यानंतर अरुज आफताबने आनंद व्यक्त करत म्हटले की, 'मला वाटते की मी बेशुद्ध पडेन.

माहिरा खानने व्यक्त केला आनंद
पाकिस्तानी (Pakistan) अभिनेत्री माहिरा खानने आफताबला ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. माहिराने ट्विट करून अरुजला शुभेच्छा दिल्या. तीने लिहिले, 'तुझा खूप अभिमान आहे. अशीच चमकत रहा. माहिरा खानशिवाय पाकिस्तानी गायक अली सेठीनेही अरुजचे अभिनंदन केले आहे.

अरुज आफताबचा जन्म सौदी अरेबियात झाला. 2005 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी ती अमेरिकेत (America) स्थलांतरित झाली. येथे तीने बर्कली कॉलेज ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

Artificial intelligence: शिकेल तोच टिकेल! 'एआय' टूल्समध्ये पारंगत व्हा, नाहीतर नोकरी धोक्यात

Goa Rain: सावधान! 'यलो अलर्ट' दोन दिवसांनी वाढला, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goa Live News: सांगे बसस्थानकासमोरील दुकानात आढळला कामगाराचा मृतदेह

Goa Film Festival 2025: 'आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना' गोव्यातील सिनेकर्म्यांची अवस्था

SCROLL FOR NEXT