<div class="paragraphs"><p>Aamir Liaquat Hussain</p></div>

Aamir Liaquat Hussain

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

कतरिना कैफच्या 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर पाकिस्तानी खासदार थिरकले

Manish Jadhav

बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. अनेक देशांमध्ये हिंदी गाणी मोठ्याने ऐकली जातात. भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये बॉलीवूड चित्रपटातील गाणी खूप पसंत केली जातात. पाकिस्तानी लोक ही गाणी केवळ गुणगुणत नाहीत तर त्यावर नाचतानाही दिसतात. अलीकडेच पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Hussain) यांनीही एका बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे.

दरम्यान, अनेक लोक त्यांना डान्सवरुन ट्रोल करत आहेत. प्रत्यक्षात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर लियाकत हुसैन सूर्यवंशी चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ तैमूर जामून नावाच्या ट्विटर हँडलने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आमिर लियाकत हुसेन ऑफ व्हाइट कुर्ता पायजमा आणि तपकिरी नेहरु जॅकेटमध्ये दिसत आहे.

तसेच, त्यांचा हा व्हिडिओ कोणत्यातरी फंक्शनमधला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर लियाकत हुसैन जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ अनेक सोशल मीडिया यूजर्संना आवडत असतानाच काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरु केले आहे. आमिर लियाकत हुसैनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले - बंधू आणि भगिनींनो, हे पाकिस्तानचे संसद सदस्य आहेत.

त्याच वेळी, इतर अनेक सोशल मीडिया यूजर्संनी आमिर लियाकत हुसैनला नृत्याबद्दल कमेंट करुन ट्रोल केले आहे. आमिर लियाकत हुसैनच्या आधी, पाकिस्तानी अभिनेत्री आणि YouTuber आयशा उमरला बॉलीवूड चित्रपटातील गाण्यावर डान्स केल्याबद्दल ट्रोल करण्यात आले होते. वास्तविक आयशा एका लग्नात मित्रांसोबत रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या 'बलम पिचकारी' गाण्यावर स्टेज परफॉर्मन्स देताना दिसली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT