OTT Release in September  Dainik Gomantak
मनोरंजन

OTT Release : लव्ह स्टोरी, सस्पेन्स - थ्रीलर पाहायला आवडतं?...मग वेबसिरीज, चित्रपटांची ही खास मेजवानी तुमच्यासाठीच

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसेच चित्रपटगृहात या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची तसेच वेब सिरीजची यादी पाहा. हे चित्रपट तुमचं मनोरंजन नक्कीच करतील.

Rahul sadolikar

OTT Release Web Series and Films : ओटीटी प्लॅटफॉर्मने अल्पावधीतच मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आहेत. वेगवेगळ्या जॉनर्सच्या वेबस्टोरीज आणि चित्रपटांनी जगभरातल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात ओटीटी प्लॅटफॉर्म कमालीचा यशस्वी झालेला दिसतो.

कॉमेडी, सस्पेन्स आणि थ्रीलर जॉनर्स मधुन भन्नाट कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची अनोखी सफर घडवून आणण्यासाठी ओटीटीने अनेक अफलातून प्रयोग केले.

नेटफ्लिक्स. Z 5, डिस्ने + हॉटस्टार या प्लॅटफॉर्म्सचा यात उल्लेख करता येईल. मनोरंजनाची नवी मेजवाणी या आठवड्यात पुन्हा एकदा तयार आहे. चला पाहुया या आठवड्यात रिलीज झालेल्या काही वेबसिरीज आणि चित्रपट.

आगामी वेबसिरीज आणि चित्रपट

आगामी रिलीजची यादीबद्दल बोलायचं म्हटलं तर या आठवड्यात 'द ग्रेट इंडियन फॅमिली', 'सुखी', 'द एक्सपेंडेबल्स 4' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहेत. 

विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' 22 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे, तर शिल्पा शेट्टी स्टारर फॅमिली ड्रामा 'सुखी' देखील याच दिवशी दाखल झाला आहे.

जाने जाने

सस्पेन्स आणि थ्रीलर शोधाच्या कहानीत तुम्हाला रस असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे,. करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांचा 'जाने जान' चित्रपट सुजॉय घोष निर्मित आहे.

करीना कपूरचा ओटीटी डेब्यू (Kareena Kapoor OTT Debut) असणारा हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट 21 सप्टेंबर 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे.

सेक्स एज्युकेशन सीझन 4 (Web Series)

Asa Butterfield, Emma Mackey, Amy Lou Wood, Nkuti Gatwa आणि Connor Swindells अभिनीत Sex Education season 4 ही वेब सिरीज 21 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

अतिथी

साऊथच्या चित्रपटांची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ओटीटीने खास गिफ्ट आणलं आहे. केशव दीपक आणि गायत्री स्टारर 'अतिथी' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

प्रेक्षक आतापासून डिस्ने + हॉटस्टारवर ही हॉरर फिल्म पाहू शकतात. कारण हा चित्रपट आधीच 19 सप्टेंबर 2023 रोजी स्ट्रीम झाला आहे.

सॉन्ग ऑफ द बैंडिट्स

कोरियन ड्रामाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 22 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवरसॉन्ग ऑफ द बैंडिट्स प्रदर्शित झाले आहे. शुक्रवारपासून प्रेक्षकांना दक्षिण कोरियाची ही मालिका पाहता येणार आहे.

कॉन्टिनेंटल फ्रॉम द वर्ल्ड ऑफ जॉन विक

वेस्टर्न सिनेमाच्या चाहत्यांसाठी या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होतो. मेल गिब्सन, कॉलिन वुडेल, मिशेल प्राडा, ह्युबर्ट पॉइंट-डू जॉर, नंग केट, द कॉन्टिनेंटल: फ्रॉम द वर्ल्ड ऑफ जॉन विक हे कलाकार 22 सप्टेंबर 2023 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहेत.

Love is Blind Seoson 5

प्रेम आंंधळं असतं यावर विश्वास असणाऱ्या लोकांसाठी ही सिरीज नक्कीच विशेष आहे. ही सिरीज तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जावे लागेल. लव्ह इज ब्लाईंड सीझन 4 शुक्रवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे.

Love Again

प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी तिची लव्ह अगेन ही नवी भेट ओटीटी तयार आहे. प्रियांका चोप्रा, निक जोनास आणि सॅम यांचा लव्ह अगेन हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा 5 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 

आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 20 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. प्रियांकाच्या चाहत्यांना आता सिटाडेलनंतर या चित्रपटात पाहण्याची उत्सुकता आहे.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT