Oscars  Awards
Oscars Awards Dainik Gomantak
मनोरंजन

Oscars 2023: भारतात कधी, केव्हा अन् कसा बघाल ऑस्कर अवॉर्ड सोहळा, वाचा एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

Oscar 2023: बॉलिवूड, टॉलीवूडपासून आणि हॉलिवूडमधील दिग्दर्शक, कलाकार, निमार्त्यापासून प्रत्येक जण ऑस्कर अवॉर्डची वाट पाहत आहे. हा अवॉर्ड अवघ्या काही तासांवर आला आहे.

यंदाचे 2023 ऑस्करचे हे 95 वे वर्ष आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक कलाकार मेहनत करत असतो. ज्या चित्रपटाला, कलाकाराला हा पुरस्कार मिळतो त्याच्या कामाला जगभरात कौतुक केले जाते.

यंदा भारतीयांसाठी हा सोहळा खूप खास असणार आहे. कारण भारतीय चित्रपटांनाही तीन नामांकने मिळाली आहेत. तर दीपिका पादुकोणला मोठा बहुमान मिळाला आहे. दीपिका यंदा पुरस्कार प्रदान करणार आहे.

  • भारतात कधी पाहता येणार

    95 व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा 12 मार्च 2023 ला होणार आहे.  लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहेत तर हा सोहळा भारतात  13 मार्च ला भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजतेपासून पाहता येणार आहे. भारतीयांना हा सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह-स्ट्रीम पाहता येणार आहे. 

'ऑस्कर नामांकन 2023' भारतासाठी खूपच खास असणार आहे. भारताला या वर्षी तीन अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले आहे. यात राजामौलींच्या आरआरआर (RRR) 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) चित्रपटांचा या समावेश आहे. राजामौली यांच्या RRR मधील "नातू नातू" ला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

या अवॉर्ड समारंभात दीपिका पदुकोण, एमिली ब्लंट, राईस अहमद, ड्वेन जॉन्सन, ग्लेन क्लोज, एरियाना डीबोस, सॅम्युअल एल जॅक्सन, जेनिफर कोनेली, मायकेल बी. जॉर्डन, जोनाथन मेजर्स, ट्रॉय कोटसुर, मेलिसा मॅककार्थी, जेनेल मोने, क्वेस्टलोव्ह, जो साल्दा पुरस्कार प्रदान करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT