Lawrence Bishnoi & Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

'जोधपूर में सलमान को मारेंगे, तब...' लॉरेन्स बिश्नोईचा जुना व्हिडिओ व्हायरल

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमन्तक

Lawrence Bishnoi Threats Salman Khan: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी लॉरेन्सने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात होता. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ आता समोर आला आहे, जो 2021 चा आहे. कुख्यात बदमाश लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात राहुन आपले नेटवर्क चालवतो. त्याच्या टोळीचे लोक दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये आहेत. (Old video of Sidhu moose killer gangster Lawrence Bishnoi threatening to kill Salman Khan goes viral)

व्हिडिओत टोळीचे अनेक सदस्य दिसत आहेत

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लॉरेन्सच्या टोळीतील अनेक लोक एकत्र दिसत आहेत. हा खास व्हिडिओ त्यावेळचा आहे, जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना मकोका प्रकरणात रिमांडवर घेतले होते. हे गुंड हरियाणा (Haryana), दिल्ली, पंजाब (Punjab), हिमाचल आणि राजस्थान (Rajasthan) पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहेत.

दुसरीकडे, लॉरेन्स आणि संपत नेहरा व्हिडिओमध्ये दिसत आहेत. संपत हा लॉरेन्सचा मित्र आणि राजस्थानचा गुंड आहे. त्याने सलमानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट्सची रेखीही केली होती. मात्र योजना यशस्वी होण्यापूर्वीच हरियाणा पोलिसांनी त्याला पकडले. व्हिडिओमध्ये लॉरेन्सला असे म्हणताना ऐकू येत आहे की, 'जेव्हा मारेल जाईल, तेव्हा कळेल. मी अजून काही केले नाही. मला विनाकारण प्रकरणात ओढले जात आहे.

बिश्नोई सलमानवर का नाराज?

खरं तर 2018 मध्ये लॉरेन्सने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान रेडी या चित्रपटाचे शूटिंग करत असताना गँगस्टर लॉरेन्सने त्याच्यावर हल्ल्याची योजना आखली होती. पण त्यात यश आले नाही. सलमानला मारण्यासाठी बिश्नोईला त्याचे आवडते हत्यार मिळाले नसल्याचे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT