Aishwarya Rai Bachchan Priyanka Chopra Dainik Gomantak
मनोरंजन

प्रियांका चोप्रा नव्हे तर ऐश्वर्या बच्चनने हॉलिवूडमध्ये मिळवले पहिले 'हे' स्थान

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील (Bollywood) ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी वर्ष 1994 आणि वर्ष 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. दोन्ही अभिनेत्रींमध्ये बरेच साम्य आहे. या दोन्ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. आज देसी गर्लने हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, हॉलिवूडमधील सर्व टप्पे गाठण्यात ऐश्वर्या प्रियांकापेक्षा एक पाऊल पुढे होती.

जीना इसी का नाम है या टीव्ही शोमध्ये अॅड गुरू प्रल्हाद कक्कड यांनी सांगितले होते की ऐश्वर्या प्रसिद्ध होती पण तिला एका कोल्ड ड्रिंकच्या अॅड शूटसाठी 21 रिटेक घ्यावे लागले. पण तरीही या अभिनेत्रीने तिच्या क्षमता आणि मेहनतीच्या जोरावर हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. पण प्रियांकाच्या आधी हॉलिवूडमध्ये भारतीय कलाकार म्हणून ती स्थिरावली होती.

2009 मध्ये, फोर्ब्सने (Forbes) ऐश्वर्याला हॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून समावेश केला होता. प्रियांकाला तोपर्यंत हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. तोपर्यंत ऐश्वर्याने हॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले होते.

इतकंच नाही तर ऐश्वर्या प्रियांका चोप्राच्या आधी ओप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीलाही पोहोचली होती. आज प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. जेव्हापासून ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबाची सून बनली तेव्हापासून तिला हॉलिवूडमध्ये विशेष काही करता आले नाही. याच कारणामुळे ऐश्वर्या पेक्षा प्रियांका चोप्रा जास्त चर्चेत आहे. निर्माता, अभिनेता आणि प्रसिद्ध गायक निक जोनासची पत्नी बनून ती खूप चर्चेत आहे. सध्या देसी गर्ल तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट मॅट्रिक्समुळे चर्चेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT