Elwish Yadav Dainik Gomantak
मनोरंजन

एल्विश यादवला नोएडा पोलिसांकडून समन्स...इतर आरोपींसमोर आणणार

मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नोएडा पोलीस या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची पोलीस कोठडी मिळवू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Rahul sadolikar

Elvish Yadav has been summoned by Noida Police : बिग बॉसचा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादवच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. रेव्ह पार्टीत सापांचं विष पुरवल्याचा आरोप असणाऱ्या एल्विशला नोएडा पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींसमोर एल्विशला हजर करण्यात येणार आहे.

पोलिस कोठडी मिळू शकते

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नोएडा पोलीस रेव्ह पार्टीत सापाच्या विषप्रकरणात इतर आरोपी आणि एल्विश यादवची ओळख पटवण्यासाठी हजर करणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नोएडा पोलीस या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची पोलीस कोठडी मिळवू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

एल्विशचे नाव चर्चेत

गेल्या आठवड्यात नोएडामधील रेव्ह पार्टीमधून साप आणि सापाचे विष जप्त करण्यात आल्याने एल्विश यादवचे नाव चर्चेत आले. पार्टीत सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

त्यानंतर आरोपींची चौकशी केली असता युट्युबर एल्विश यादवचे नाव पुढे आले. अटक केलेल्या लोकांनी उघड केले की ते 26 वर्षीय बिग बॉस ओटीटी विजेत्याने आयोजित केलेल्या पार्ट्यांना साप पुरवायचे.

बेकायदेशीर पार्ट्यांचा आरोप

दुसरीकडे, भाजप खासदार मनेका गांधी यांच्या एनजीओ पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) ने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. एनजीओने आरोप केला आहे की एल्विश यादवने नोएडामधील फार्महाऊसमध्ये बेकायदेशीर पार्ट्यांचे आयोजन केले होते, जिथे परदेशी मुलींना मद्यपान करून सापाचे विष खाण्यासाठी आमंत्रित केले जात होते.

एल्विशने आरोप फेटाळले

एल्विश यादवने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इंस्टाग्रामवर एका व्हिडिओ पोस्टमध्ये, YouTuber म्हणाले की ते पोलिसांना पूर्ण सहकार्य करतील आणि जर कोणताही आरोप सिद्ध झाला तर ते संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेतील. याप्रकरणी मेनका गांधींवर खटला भरण्याची धमकीही यूट्यूबरने दिली आहे.

भारतीय तटरक्षक दलाला सलाम...! अरबी समुद्रात बहादुरी गाजवत ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले; गोव्यात यशस्वी उपचार VIDEO

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

SCROLL FOR NEXT