priyanka chopra nick jonas  Instagram
मनोरंजन

निक जोनास प्रियंकासोबत साजरा करणार रोमँटिक बर्थडे, व्हिडिओ व्हायरल

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांका यांनी 2018 मध्ये लग्न केले. प्रियांका निकपेक्षा जवळपास 11 वर्षांनी मोठी आहे.

दैनिक गोमन्तक

Nick Jonas Birthday: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे चित्रपट जगतातील 'आयडॉल कपल' मानले जातात. निक हा अमेरिकन गायक, अभिनेता आणि गीतकार आहे. तर प्रियांका ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. या सुंदर अभिनेत्रीने देशातच नाही तर परदेशातही आपले नाव कमावले आहे.

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांका यांनी 2018 मध्ये लग्न केले. प्रियांका निकपेक्षा जवळपास 11 वर्षांनी मोठी आहे. त्यांना मारिया मालती जोनास चोप्रा नावाची मुलगी देखील आहे. आज म्हणजेच 16 सप्टेंबरला निक त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्त सिंगरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या तयारीचे दृश्य या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते. काळ्या टी-शर्ट आणि काळ्या सनग्लासेसमध्ये निक स्मार्ट दिसत आहे. निकच्या या व्हिडिओमध्ये तो त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये असल्याचे दिसत आहे, तसेच त्याचा इंटिरियर डिझायनर बर्थडेचा बॅनर घेऊन उभा आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा डेनिम आउटफिटमध्ये फोनवर बोलताना दिसत आहे.

जोनासच्या कारकिर्दीबद्दल, त्याचा पहिला अल्बम इट्स अबाऊट टाइम 2016 मध्ये रिलीज झाला. यानंतर त्याच्या बँडने डिस्ने चॅनलवर चांगले यश मिळवले. प्रियांकाच्या आधी निकने अनेक मुलींना डेट केले आहे. एका मुलाखतीत त्याने कबूल केले की त्याची पहिली गर्लफ्रेंड मायली सायरस होती. पण याचा निक आणि प्रियंकाच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT