Diwali Holiday In New York Dainik Gomantak
मनोरंजन

Diwali Holiday In New York: न्यूयॉर्कच्या महापौरांकडून दिवाळी दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित; प्रियांका चोप्रा झाली भावूक

महापौर म्हणाले, लहान मुलांना प्रकाशाचा सण माहिती असायला हवा

गोमन्तक डिजिटल टीम

Diwali Holiday In New York: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिड अॅडम्स यांनी दिवाळीदिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. त्यावरून देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास हीने इन्स्टाग्रामवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निर्णयाने प्रियांका भावूक झाल्याचे दिसून आले.

न्युयॉर्कच्या महापौरांच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून केली जाणार आहे. 2023 च्या दिवाळीत येथील सर्व सार्वजनिक शाळांना सुट्टी असणार आहे. महापौर अॅडम्स यांनी दोन दिवसांपुर्वी हा निर्णय जाहीर करताना म्हटले होते की, मुलांना दिवाळीबाबत माहिती असायला हवी, त्यांना प्रकाशाचा हा सण माहिती असायला हवा. जेणेकरून स्वतःचे जीवनही ते प्रकाशमान करतील.

या निर्णयानंतर पीसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. न्यूयॉर्कच्या स्टेट असेम्बलीच्या सदस्य जेनिफर राजकुमार यांचा हा व्हिडिओ आहे. यात जेनिफर म्हणतात की, 2023 पासून न्यूयॉर्क शहरात दिवाळीदिवशी शाळांना सार्वजनिक सुट्टी असेल. आपली वेळ आता आली आहे. न्यूयॉर्कमधील दोन लाखाहून अधिक हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मातील लोक जे दिवाळी सण साजरा करताात त्यांच्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे.

हा व्हिडिओ शेअर करून प्रियांकाने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियांका भावना अनावर झाल्याचे तिच्या कॅप्शनमधून दिसते. आज इतक्या वर्षानंतर माझे लहानपण जे अमेरिकेच्या क्वीन्स भागात राहत होते, त्या माझ्या लहानपणाला आनंदाश्रू अनावर झाले आहेत, अशी कॅप्शन तिने लिहिली आहे.

प्रियांका अमेरिकेतून शालेय शिक्षण घेतले होते. तिच्या मावशीसोबत ती अमेरिकेत अनेक ठिकाणी राहिली आहे. 2018 मध्ये तिने अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्न केले. लग्नानंतर प्रियांका अमेरिकेतच वास्तव्यास असून तिथे ती भारतीय सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत असते. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर ती आगामी काळात रूसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या सीरीजमध्ये दिसणार आहे. याशिवाय हिंदी 'जी ले जरा'मध्येही ती दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT