Happy Birthday Prabhas Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Birthday Prabhas: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त 'आदिपुरुष' चे नवे पोस्टर रिलीज

Adipurush Latest News: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या वाढदिवसानिमीत्त साधत ओम राऊत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं नवे पोस्टर शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक

'बाहुबली' द्वारे जगभरात ओळख मिळवणारा प्रभास आज त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमीत्त दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) वाढदिवसानिमीत्त ओम राऊतांनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) दमदार संदेश देत चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. त्यांनी पोस्टर शेअर करत लिहिले, "मिळवूनी वानरसेना राजा राम प्रगटला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम.'' या पोस्टरमध्ये प्रभासनं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामांच्या भूमिकेत दिसत आहे.

प्रभासबाबत बोलताना ओम राऊत म्हणाले, ''प्रभास हा आपल्या भूमिकेसाठी अत्यंत मेहनत घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हे पोस्टर त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.''

आदिपुरुष हा चित्रपट (Movie) 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभासने राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' चित्रपट रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT