Janhvi Kapoor Khushi Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Janhvi Kapoor's Dating Tips: कधीही 'या' व्यक्तीला डेट करू नको; जान्हवीने बहिण खुशीला दिल्या डेटिंग टिप्स

स्वतःची किंमत ओळखण्याचाही सल्ला; खुशी करतेय 'द आर्चीज'मधून बॉलीवुडमध्ये पदार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

Janhvi Kapoor's Dating Tips: अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची बहिण खुशी या कपूर सिस्टर्स अलीकडच्या काळात सतत चर्चेत असतात. दोन्ही बहिणींमध्ये जान्हवी मोठी असल्याने ती नेहमीच खुशीला वेगवेगळ्या विषयांवरून सल्ले देत असते. नुकतेच जान्हवीने तिच्या धाकट्या बहिणीला असाच एक सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे.

जान्हवीने खुशीला, कधीही कुठल्याही अभिनेत्याला डेट करू नये, असा सल्ला दिला. त्यावरून जान्हवी यापुर्वी कुठल्या तरी अभिनेत्याला डेट केले होते, या चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच करन जोहरच्या शोमध्ये सारा अली खान आणि जान्हवी सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी दोन सख्ख्या भावांना डेट केल्याचे समोर आले होते.

जेव्हा जान्हवीला विचारले गेले की, तिची बहिण लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे, तर तिला जान्हवी काय सल्ला देईल? त्यावर जान्हवी म्हणाली की, तिने कधीही कुठल्याही अभिनेत्याला डेट करू नये. कारण मी आणि खुशी अशा मुली आहोत की ज्यांनी असे न करणेच योग्य असेल.

जान्हवी म्हणाले की, स्वतःचे महत्व तिन ओळखले पाहिजे. स्वतःचे टॅलेंट तिने ओळखावे. पडद्यावर दाखवण्याचे आपल्याकडील टॅलेंट तिला माहिती असावे. इन्स्टाग्रामवर ट्रोलिंग करणाऱ्यांची तिने अजिबात फिकीर करू नये. मला यातून बाहेर पडायला अडचणी आल्या. पण ती आधीच या सर्वासाठी तयार असावी. जीवनात अनेक संधी मिळतात. स्टार किड्स असल्यामुळे नाही, पण टॅलेंटेड असल्याने.

एकीकडे जान्हवीने बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे तर खुशी लवकरच दिग्दर्शक झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे. यात शाहरूख खानची कन्या सुहाना, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये रीलीज होणार आहे. दरम्यान, जान्हवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर आगामी काळात ती 'मिस्टर अँड मिसेस माही', 'बवाल' आणि 'किट्टी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT