नेटफ्लिक्स या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते. चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. नेटफ्लिक्स कंपनीने सात वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Netflix Latest News)
नेटफ्लिक्सने दिलेल्या गाईडलाईनमध्ये 'आर्टिस्टिक एक्सप्रेशन' नावाच्या नव्या सेक्शनचा समावेश करण्यात आला आहे. या सेक्शनमधून प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रोग्रॅम्सच्या ऑफर्स देण्यात येणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कलाकार किंवा कंटेंट हा सेन्सॉर करण्याऐवजी आम्ही प्रेक्षकांना (fan) त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवून देऊ शकतो. नेटफ्लिक्स कंपनीला त्यांच्या कंटेंटमध्ये कथांमध्ये विविधता आणू इच्छिते.
नव्या गाईडलाईननुसार नेटफ्लिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जो कंटेंट आवडणार नाही त्या कंटेंटवर देखील अधिक काम करावे लागेल. कंपनीनं या गाईडलाईन्समध्ये असे सांगितले, जे कर्मचारी या प्लॅटफॉर्मवरील कंटेंटला समर्थन करणार नाहीत किंवा ज्यांना कंटेंट आवडला नाही ते नोकरी सोडू शकतात.'
नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले, कर्मचाऱ्यांसोबत सांस्कृतिक विषयांवर अंतर्गत चर्चा करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागला. नव्या गाईडलाईनचा उद्देश हा कर्मचाऱ्यांना सूचना देणे हा आहे. ज्यामुळे हे कर्मचारी ठरवू शकतील की नेटफ्लिक्स ही कंपनी त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही.
कर्मचाऱ्यांना नवे मार्गदर्शक तत्त्वांवर प्रतिक्रिया देण्याची संधी देण्यात आली होती. नेटफ्लिक्सला 1,000 हून अधिक टिप्पण्या मिळाल्या. त्यानंतर नव्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या. टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्कने नेटफ्लिक्स कंपनीच्या या नव्या गाईडलाईन्सचे कौतुक केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.