Neha Kakkar-Falguni Pathak Fight Dainik Gomantak
मनोरंजन

Neha Kakkar-Falguni Pathak Fight : नेहा कक्कर-फाल्गुनी पाठकमध्ये 'पॅचअप'? जाणून घ्या

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.

दैनिक गोमन्तक

Neha Kakkar-Falguni Pathak Fight : बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच इंडियन आयडॉलचा एक प्रोमो समोर आला होता, ज्यामध्ये नेहा आणि फाल्गुनी इंडियन आयडॉलच्या मंचावर एकत्र दिसल्या होत्या. या प्रोमोनंतर या दोन गायकांमध्ये पॅचअप झाल्याची अटकळ बांधली जात आहे. पण बुधवारी फाल्गुनी पाठकने सोशल मीडियावर असे मीम शेअर केले आहेत, ज्यात थेट नेहा कक्करच्या 'ओ सजना' गाण्याला लक्ष्य केले आहे.

(Neha Kakkar-Falguni Pathak Fight)

फाल्गुनी-नेहाचा वाद पुन्हा पेटला

ज्येष्ठ गायिका फाल्गुनी पाठकने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अनेक मीम्स शेअर केले आहेत. जे नेहा कक्करने गायलेले 'मैने पायल है छनकाई' या तिच्या प्रसिद्ध गाण्याचे साजन हे रिमिक्स अद्यापही फाल्गुनीला आवडले नाही हे यावरून सूचित होते. फाल्गुनी पाठकने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सूर्यवंशमच्या चित्रपटातील रक्ताच्या उलट्या होणाऱ्या दृश्याची मीम शेअर केली आहे.

यासोबतच असे अनेक मीम्स आहेत जे नेहा-फाल्गुनी वाद अजून संपलेला नाही हे दर्शवतात. मात्र, या मीम्समध्ये फाल्गुनी पाठकने नेहा कक्करचे नाव लिहिलेले नाही. पण फाल्गुनी कुठे इशारा करत आहे आणि ती असे मीम्स का शेअर करत आहे हे सर्वांना माहीत आहे.

नेहा आणि फाल्गुनीमध्ये का आहे वाद?

गायिका नेहा कक्करने नुकतेच तिचे ओ सजना गाणे रिलीज केले आहे. नेहाचे हे गाणे 1999 मध्ये आलेल्या फाल्गुनी पाठकच्या मैने पायल है छनकाई या सदाबहार गाण्याचे रिमिक्स आहे. अशा परिस्थितीत नेहा कक्करने गायलेले ओ सजना हे गाणे लोकांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे नेहाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. याशिवाय फाल्गुनी पाठकने नेहा कक्करवरही जोरदार टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT