NCB Dainik Gomantak
मनोरंजन

रिया चक्रवर्तीची चौकशी करणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्याची हकालपट्टी

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे गुप्तचर अधिकारी विश्वनाथ तिवारी यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले असून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर विश्वनाथ तिवारी या प्रकरणाशी संबंधित रिया चक्रवर्तीसह संबंधित सेलिब्रिटींची चौकशी करत होते. तिवारी यांच्या बडतर्फीचे आदेश गुरुवारी रात्री दिल्ली एनसीबीच्या मुख्यालयातून जारी करण्यात आले. (NCB Mumbai Intelligence Officer Vishwanath Tiwari Sacked From Job)

एनसीबीचे अधिकारी विश्वनाथ तिवारी (Vishwanath Tiwari) यांच्यावर परवानगीशिवाय परदेशात जाऊन काळा पैसा मिळवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांची दक्षता चौकशी करण्यात आली होती. त्यांनतर या संपूर्ण प्रकरणाच्या दक्षता चौकशीनंतर एनसीबीने तिवारी यांची नोकरीवरून हकालपट्टी करत त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (Mumbai Cruise Drugs Case) NCB अधीक प्रकाशात आली होती. त्यावेळी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह एकूण 20 जणांना एनसीबीने अटक केली होती. त्यामुळे एनसीबीवर अनेक आरोप झाले होते. जे नवाब मलिक यांनी लावून धरले होते. त्यानंतर या प्रकरणाला 6 महिने ओलांडले तरी एनसीबीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. तर आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाहीत. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीने मुंबई न्यायालयात (Mumbai Court) अर्ज करून ९० दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र हा अर्ज रद्द करून न्यायालयाने केवळ ६० दिवसांची मुदत दिली आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) जामीनावर बाहेर असून अद्याप त्याला दिलासा मिळालेला नाही. आता फक्त एनसीबीच्या चार्जशीटची प्रतीक्षा आहे, एनसीबी आर्यनवर काय आरोप लावते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोव्यात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची आता खैर नाही, थेट वाहन जप्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Goa Accidents: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! चार अपघातांमध्ये सातजण जखमी

Bicholim PirachiKond: अखेर ‘पिराचीकोंड’ झोपडपट्टी जमीनदोस्त! पोलिस फौजफाट्याच्या उपस्थितीत कारवाई

St Estevam Accident: पोलिसांचे पुन्हा 'सांतइस्तेव खाडीत' शोध कार्य! युवतीच्या जबाबात मात्र बराच गोंधळ

सत्तरीच्या बंटी - बबलीचा आणखी एक पराक्रम, दोडामार्गमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली एकाला 15 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT