मनोरंजन

Haddi Trailer : हातात सुरा, तोंडात सिगारेट आणि देखणं रूप... नवाजच्या हड्डीचा हटके ट्रेलर पाहिलात का?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहुप्रतिक्षित हड्डी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

बुधवारी (23 ऑगस्ट) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या आगामी हड्डी या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर शेअर केला.अनुराग कश्यपची महत्त्वाची भूमीका असणारा हड्डीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

हा क्राईम ड्रामा दिल्ली एनसीआर, गुडगाव आणि नोएडाच्या भागात कार्यरत असलेल्या गुन्हेगारांभोवती फिरतो. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनची पहिल्यांदाच ऑनस्क्रीन ट्रान्सजेंडर म्हणून ओळख करून देण्यात आली आहे.

आमचा बदला धोकादायक

हातात सुरा घेतलेल्या एका निर्दयी ट्रान्सजेंडर गुन्हेगाराची भयंकर झलक दिसते आणि ट्रेलर सुरू होतो. इथे नवाजचा संवाद सुरू होतो, तो म्हणतो लोक ट्रान्सजेंडरला घाबरतात का तुम्हाला माहीत आहे का? आमचे आशीर्वाद शक्तिशाली आहेत आणि आमचा शाप धोकादायक आहे. आमचा बदला खूपच धोकादायक आहे.”

या क्लिपमध्ये एका ट्रान्सजेंडरा प्रवास दाखवण्यात आला आहे, तो एक लुटारू ट्रान्सजेंडर होण्यापासून ते क्षुल्लक गुन्ह्यांपासून वाचलेल्या ट्रान्सजेंडर समुदायात सामील होण्यासाठी अलाहाबादहून दिल्लीला जाण्यापर्यंतचा त्याचा प्रवास ट्रेलरमध्ये दिसतो.

हड्डीचा ट्रेलर अजुन पुढे जातो...

अखेरीस, हड्डीचा ट्रेलर पाहताना आपल्या कथेची थोडक्यात कल्पना येते.  आयुष्याचा संघर्ष सुरू असताना तो त्याच्या ट्रान्सजेंडर कुटुंबाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ट्रान्सजेंडर समुहाचं नेतृत्व इला अरुण करते. इला अरुण ही शहरातला गँगस्टर-राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या अनुराग कश्यपच्या अन्यायाला बळी पडलेली आहे.

 नवाजुद्दीन आणि अनुराग यांच्याशिवाय या चित्रपटात इला अरुण, मोहम्मद जीशान अय्युब, सौरभ सचदेव, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा आणि सहर्ष शुक्ला यांच्याही भूमिका आहेत.

नवाजची कॅप्शन

हड्डीचा ट्रेलर शेअर करताना नवाजुद्दीनने इंस्टाग्रामवर लिहिले की, “बदला कधी इतका थंडगार दिसला आहे का? #हड्डी येत आहे.. सूडाची कहाणी जी हादरवुन सोडेल. 7 सप्टेंबर रोजी फक्त #ZEE5 #HaddiOnZEE5 वर प्रदर्शित होत आहे.

 ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना, एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, “तुझ्यासारखे कोणीही नाही, नेहमीच उत्कृष्ट.” दुसऱ्या एका युजरने “मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनेता,” अशा शब्दात नवाजचे कौतुक केले आहे.

हड्डीचे दिग्दर्शन

हड्डीचे दिग्दर्शन आणि सहलेखन अक्षत अजय शर्मा आणि अदम्य भल्ला यांनी केले आहे. हड्डीचं योग्य वर्णन करायचं तर झी स्टुडिओ आणि आनंदिता स्टुडिओज निर्मित, हड्डी हा गुन्हेगारीचा सूड घेणारा क्राईम ड्रामा आहे. हड्डीचा प्रीमिय 7 सप्टेंबरला होणार आहे.

नवाज म्हणतो

हड्डीबद्दल बोलताना नवाजुद्दीनने यापूर्वी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले होते, "मी खूप दिवसांपासून यावर खूप मेहनत घेतली आहे. हड्डीच्या चित्रीकरणापूर्वी मी (ट्रान्सजेंडर) समुदायामध्ये राहिलो. मला जाणवले की ते महिलांशी संबंधित आहेत. त्यांना एक स्त्री बनण्याची इच्छा आहे.

भूमीका करताना काय वाटलं?

भूमिका साकारण्यासाठी मी काही गोष्टी लक्षात ठेवल्या. मला नेहमी वाटायचं की मी स्त्रीची भूमिका करत आहे. ही गोष्ट मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवणारी असायची. शूटिंग संपताच मी नि:श्वास सोडला. मी स्वत:ला सांगितलं मला शूटिंग करून झोपून जा...

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT