Raj Kundra was arrested by Mumbai Police on Monday in pornography case  Dainik Gomantak
मनोरंजन

Naughty Raj Kundra: अटकेनंतर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) हे फेब्रुवारी मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न फिल्म रॅकेट मध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या अटकेनंतर नेटकऱ्यांनी मात्र मनसोक्त आनंद घेत Naughty Kundra (Naughty Kundra) म्हणत त्याची खिल्ली उडवली

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती तसेच प्रसिद्ध उद्योपती राज कुंद्रा (Raj Kundra) हे फेब्रुवारी मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न फिल्म रॅकेट मध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे.आणि याच प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) काल राज कुंद्रा यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेनंतर नेटकऱ्यांनी मात्र मनसोक्त आनंद घेत Naughty Kundra (Naughty Kundra) म्हणत त्याची खिल्ली उडवायला सुरवात केली आहे. (Naughty Kundra: Twitterati on roar after Raj Kundra arrested in porn movies case)

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चक्क मिम्सचा पाऊसच पाडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला याला सोमवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली आहे. क्राइम ब्रँचने त्यांची कित्येक तास चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. राज कुंद्रा यांना काही अ‍ॅप्सद्वारे अश्‍लील चित्रपट बनवण्यासाठी आणि प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली होती.वुई ट्रान्सफरच्या माध्यमातून राज कुंद्रा विदेशात पॉर्न फिल्म पाठवत होता.या धंद्यात राजने 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील केली होती.

राज कुंद्राने रायनवर अश्लील व्हिडिओ लिंकची तांत्रिक बाब सोपविली होती. हे अश्लील चित्रपटाचे रॅकेट मुंबई ते लंडन कसे चालले आहे याविषयी रायनला सर्व माहिती होती.एच अकाउंट्स या नावाने राजने या सर्व रॅकेटचा व्यवहार करण्यासाठी त्याने ५ जणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता. राजच्या या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये या प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा या ग्रुप मध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

कमावलेल्या पैशांचा आकडा या चॅटमधून आणि व्हिडिओतून समोर आला आहे. त्यामध्ये टोटल ऑर्डर 1433, टोटल कॉइन्स 3,32,483 ,टोटल सेल 4,40,363 आणि एमटीडीसी सेल 27,81,551 असा हिशोब देखील मांडण्यात आला असून कुंद्रा यांचं लोकांशी चॅट केलेला पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.या प्रकरणात राज कुंद्रा हा आज न्यायालयात हजर होणार आहे. राजला किती दिवस रिमांडवर पाठवायचे की जामीन द्यायची हे आता हे न्यायालय निर्णय घेणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT