Naseeruddin Shah Dainik Gomantak
मनोरंजन

लग्नानंतरही रत्ना पाठक यांनी कधीच इस्लाम स्वीकारला नाही, नसीरुद्दीन शाह यांच्या आई म्हणाल्या...

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी कधीही इस्लाम धर्म स्वीकारला नाही, यावर नसीरजींच्या आईने अशी प्रतिक्रिया दिली होती...

Rahul sadolikar

Naseeruddin Shah - Ratna Pathak : अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक यांच्या आयुष्यातला तो संघर्ष आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्य आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची होत आहे. त्यांचा विवाह रत्ना पाठक यांच्याशी झाला होता. हे त्यांचे दुसरे लग्न होते. दोघांची भेट NSD मध्ये झाली ;पण लग्नानंतर दोघांनाही एका गोष्टीमुळे संघर्ष करावा लागला.

नसीर- रत्नाचे प्रेम

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह(Naseeruddin Shah) आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक(Ratna Pathak) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहे. या दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले हे तुम्हाला माहीत आहे का? 

दोघांच्या प्रेमात धर्माचा अडसर होताच ;पण सोबत नसीरुद्दीन शाह यांच्या वैवाहिक आयुष्याचाही होता. नसीरुद्दीनचेही लग्न झाले होते, पण तरीही रत्ना पाठक यांना नसीरजींनी स्वत:पासुन दूर केले नाही. कोणी वेगळे करू शकले नाही. 1982 मध्ये दोघांनी कायमचा एकमेकांचा हात धरला होता. त्यांना इमाद आणि विवान ही दोन मुले आहेत.

लग्नानंतर मोठी अडचण

नसीरुद्दीन शाह यांनी अलीकडेच 'नॅशनल हेराल्ड' सोबत एक खुले पत्र प्रकाशित केले, ज्यात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टी उघड केल्या. 

विशेषतः या पत्रात त्यांनी रत्ना पाठकसोबतच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल. रत्नाने लग्नानंतर धर्म का बदलला नाही याबद्दल त्यांची आई सुरुवातीला कशी गोंधळात पडली हे त्याने सांगितले.

नसीरजींच्या आई म्हणाल्या

नसीरुद्दीन, म्हणाले, , माझी पत्नी रत्ना हिच्या इस्लाम धर्मांतराचा विषय माझ्या आईने फक्त एकदाच उपस्थित केला होता. चौकशी करताना नसीरजींच्या आईनेही एक आश्चर्यकारक उत्तर दिले त्या म्हणाल्या, 'हो, धर्म कसा बदलता येईल' .'

नसीरुद्दीन शाहांचं पुर्वीचं लग्न

नसीरुद्दीन शाह यांचा रत्ना पाठकपूर्वी मनारा सिक्रीशी विवाह झाला होता. त्यांना हिबा नावाची मुलगी आहे. 70 च्या दशकात अभिनेता रत्नाला भेटला होता. 

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. ते अनेक वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्येही होते.

ज्या वर्षी नसीरुद्दीनने रत्नासोबत लग्न केले त्याच वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र त्यांचा मृत्यू  कसा झाला याचे कारण समजू शकले नाही. मनारा यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी सध्या नसीरुद्दीन आणि रत्ना यांच्यासोबतच राहते.

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

CBI अधिकारी बनून फसवणूक! बंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला 32 कोटींचा गंडा, मानसिक त्रासाने बिघडली महिलेची तब्येत

SCROLL FOR NEXT