Naseeruddin Shah  Dainik Gomantak
मनोरंजन

Naseeruddin Shah: '...म्हणून मी हिंदी चित्रपट पाहत नाही' नसरुद्धीन शहांचे मोठे वक्तव्य

Naseeruddin Shah: 'उमराव जान', 'जाने भी दो यारो', 'हीरो हिरालाल', 'कभी हान कभी ना', 'ओंकारा', 'ए वेनस्डे!', 'द डर्टी' अशा चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.

दैनिक गोमन्तक

Naseeruddin Shah: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. चर्चेत असण्याची कारणे नेहमी वेगवेगळी असते. कधी चित्रपट, कधी वक्तव्ये तर कधी वैयक्तिक आयुष्य तर कधी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्ट असतात. आता आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नसरुद्धीन शहा यांनी आता हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठे वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीवर वक्तव्य केले आहे. ते म्हणतात- हिंदी चित्रपटसृष्टीच्या सद्यस्थितीमुळे मी निराश आहे. मी हिंदी सिनेमा पाहणे बंद केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान वाटतो. पण सध्या मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे, मला हे अजिबात आवडत नाहीत.

73 वर्षीय अभिनेते नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले की, जगभरात हिंदी चित्रपट पाहिले जातात कारण भारतीयांना या चित्रपटांनी मूळ आणि त्यांच्या मातृभूमीशी जोडलेले आहे. पण आता चित्रपट वेगळ्या पद्धतीचे बनत आहेत. अशाच गोष्टी चालू राहिल्या तर लवकरच सर्वांना कंटाळा येईल. ते म्हणाले, 'हिंदुस्थानी पदार्थ सर्वत्र आवडतात कारण त्यात पदार्थ चव असते. तसच चित्रपटांचेदेखील आहे.

हिंदी चित्रपटांची ताकद काय आहे? जगभरात आपल्या चित्रपटांवर सर्वत्र लक्ष ठेवले जाते. मात्र लवकरच आपल्या हिंदी चित्रपटांचा लोकांना कंटाळा येईल कारण त्यात काही अर्थ नाही. पुढे बोलताना म्हणतात- हे सगळं तेव्हा थांबू शकते जेव्हा लोक चित्रपटनिर्मितीला पैसे कमावण्याचे साधन मानणे बंद करतील.

नसरुद्धीन शहांनी आपल्या करिअरमध्ये अनेक भाषांमध्ये शंभरहून अधिक चित्रपट केले आहेत. 'उमराव जान', 'जाने भी दो यारो', 'हीरो हिरालाल', 'कभी हान कभी ना', 'ओंकारा', 'ए वेनस्डे!', 'द डर्टी' अशा चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. याबरोबरच त्यांनी 'युं होता तो क्या होता' या नाटकाचे दिग्दर्शनही केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT