Nandita Das
Nandita Das Dainik Gomantak
मनोरंजन

'हा माझा रंग आहे, मी माझं आयुष्य या रंगासोबतच जगले आहे अन् या रंगासोबतच मरेन'- असं का म्हणाली Nandita Das

दैनिक गोमन्तक

Nandita Das: नंदिता दास यांनी दिग्दर्शित झ्विगाटोचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. झ्विगाटोच्या या ट्रेलरला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. चित्रपटाबरोबरच रंगाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नंदिता दास सध्या चर्चेत आहेत.

नंदिता दास यांनी एका मुलाखतीदरम्यान, रंगामुळे त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागल्याचे सांगत अभिनयापासून चित्रपट दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास सागंतिला आहे.

कॉलेज जीवनापासून ते अभिनय क्षेत्रापर्यत रंगावरुन कसे त्यांना वागवले गेले याबद्दल आपला अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. नंदिता दास यांनी म्हटले आहे की, सावळ्या रंगाची अभिनेत्री जर चित्रपटात असेल तर तिची भूमिका ठरलेली असते.

तिला एक तर खलनायिकेच्या भूमिकेत नाहीतर साधी सरळ मुलगी अशी भुमिका दिलेली असते. ज्या देशात सगळ्यात जास्त लोक सावळ्या रंगाचे आहेत त्या देशातदेखील गोरेपणाला महत्व दिले जाते.

याबद्दल पुढे बोलताना त्या म्हणतात- माझ्याबद्दल जर कोणते आर्टिकल लिहले गेले तर ते सुद्धा 'डस्की ब्यूटी नंदिता दास' अशा नावाने लिहले जायचे. जसं की माझी ओळख माझा रंग आहे.

मला लहानपणापासून हळद,चंदन पावडर लावण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जायचा. माझा रंग सावळा असल्याने मी उन्हात खेळू नये असेही मला सांगितले जायचे. मात्र मी कधीही गोरे होण्यासाठी प्रयत्न केल्याचे आठवत नाही.

मी कधीही फेअरनेस क्रीम वापरली नाही. मी मोठी होत गेले तशी ही माझी त्वचा आहे, हा माझा रंग आहे, मी माझं आयुष्य या रंगासोबतच जगले आहे आणि या रंगासोबतच मरेन अशी उत्तर लोकांना देऊ लागले असं नंदिता दास यांनी म्हटले आहे.

विशेष बाब म्हणजे नंदिता फक्त स्वत:वर होणाऱ्या टिपण्णीला उत्तरं देऊन शांत बसल्या नाहीत. तर भारतात होणाऱ्या रंगभेदभावाला विरोध करण्यासाठी, हा भेदभाव कमी करण्यासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली.

इंडियाज गॉट कलर किंवा डार्क इज ब्यूटीफुल या नावाने त्यांनी कॅम्पेंन सुरु केले. याअंतर्गत माणसाला त्याचा रंग जसा आहे तसा सेलिब्रेट करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं. यासाठी नंदिताने दोन मिनिटांचा म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी भाग घेतला आहे.

दरम्यान, नंदिता दास दिग्दर्शित झ्विगाटोमध्ये कपिल शर्माने प्रमुख भूमिका साकारली आहे. 17 मार्च रोजी झ्विगाटो चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. नंदिता दास यांनी यापूर्वी फिराक आणि मंटो हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT