Nana Patekar Passed Away Dainik Gomantak
मनोरंजन

Nana Patekar Passed Away: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास

Veteran actor Nana Patekar has passed away: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली असून, त्यांच्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Sameer Amunekar

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली असून, त्यांच्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. उपलब्ध माहितीनुसार, गुरूवारी (८ ऑक्टोबर) पहाटे त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. नाना पाटेकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी अभिनेते होते.

पहाटे अचानक बिघडली प्रकृती

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांची प्रकृती पहाटे अचानक गंभीर झाली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. सुमारे 45 मिनिटे त्यांच्यावर सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

अभिनयाच्या वेगळ्या शैलीने निर्माण केली ओळख

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांचा अभिनय, संवादफेक आणि व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतण्याची शैली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘तिरंगा’, ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘क्रांतिवीर’मधील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.

मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीशीही घट्ट नातं

नाना पाटेकर यांचा प्रवास केवळ हिंदी चित्रपटांपुरता मर्यादित नव्हता. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीशी त्यांचे जवळचे नाते होते. अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही त्यांनी काम केले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून झाली. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

चाहत्यांमध्ये शोककळा

नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील एका प्रभावी पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 8 Oct 2026: करिअर-व्यवसायात मोठं यश मिळण्याचा योग! 'या' राशींसाठी गुरुवार खास; जोडीदारासोबतचे वाद मिटणार

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

SCROLL FOR NEXT