Nana Patekar  dainik gomantak
मनोरंजन

Nana Patekar: 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात नसल्याबद्दल अखेर नाना बोलले! 'त्यांना वाटतं आम्ही जूने...'

Nana Patekar: संपूर्ण बॉलीवूड जरी चित्रपटात आणलं तरी नाना आणि अनिल कपूर यांची कमी पूर्ण करु शकत नाहीत असे प्रेक्षक सोशल मिडियावर म्हणताना दिसून येत आहेत.

दैनिक गोमन्तक

Nana Patekar: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चांचा भाग बनला आहे. सोशल मिडियावर खास पोस्ट करत त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना माहीती दिली होती.

वेलकम चित्रपटाच्या सिरिजचा तिसरा भाग म्हणजेच 'वेलकम टू द जंगल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपटाचे थीम सॉंग प्रदर्शित करत त्याने ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे.

मात्र चाहत्यांनी नाना पाटेकर आणि अनिल कपूर हे यामध्ये दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आता नाना पाटेकर यांनी देखील चित्रपटात नसल्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

नाना म्हणतात- काहींना वाटतं आम्ही म्हातारे झालो आहोत, जूने झालो आहोत त्यामुळे वेलकम टू द जंगलचा मी भाग नाही. पण काहींना तसे वाटत नाही. विवेक अग्नीहोत्रींना तसे वाटत नाही, म्हणून त्यांनी मल द वॅक्सिन वॉर मध्ये घेतले.

इंडस्ट्री तुमच्यासाठी कधीही बंद होत नाही. तुम्ही जर चांगले काम करु इच्छित असाल तर लोक येतात, तुम्हाला विचारतात. फक्त तुमची चांगले काम करण्याची इच्छा असायला हवी. असे म्हणत नाना पाटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या चित्रपटाच्या माधम्यातून रवीना टंडन पून्हा एकदा बॉलीवू़डमध्ये पदार्पण करत आहे. 2007 मध्ये 'वेलकम' रिलीज झाला होता ज्यामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त अनिल कपूर, परेश रावल, कतरिना कैफ, नाना पाटेकर यांसारखे स्टार्स दिसले होते.

त्यावेळी दिग्दर्शन अनीस बज्मीने केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलची तयारी केली. ज्याला निर्मात्यांनी वेलकम बॅक असे नाव दिले आहे. याचं दिग्दर्शनही अनीस बज्मी यांनी केलं होते.

आता मात्र वेलकम टू द जंगल या चित्रपटात नाना पाटेकर दोघेही दिसत नसल्याने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. संपूर्ण बॉलीवूड जरी चित्रपटात आणलं तरी नाना आणि अनिल कपूर यांची कमी पूर्ण करु शकत नाहीत असे प्रेक्षक सोशल मिडियावर म्हणताना दिसून येत आहेत. २०२४ च्या डिसेंबरला वेलकम टू द जंगल हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL Football: 2 स्पॅनिश खेळाडूंचे गोल, नॉर्थईस्टचा विजय! चर्चिल ब्रदर्सची पराभवाची हॅट्ट्रिक; 4 सामन्यांत 10 गोल स्वीकारले

VIDEO: क्रिकेटच्या मैदानावर थरारक घटना! क्षेत्ररक्षण करताना खेळाडूचा पाय घसरला; वेदनेने विव्हळत मैदानातच पडला, स्ट्रेचरवरून न्यावे लागले बाहेर

Goa Government Employees: 18 वर्षे वेतन आयोग बदललाच नाही! सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचाऱ्यांचा डिसेंबरपासून एल्गार

Shavina Shirodkar Controversy: शविना शिरोडकर प्रकरण तापले! माफीवरून वाद कायम; अजय खोलकरांविरोधात केपे पोलिसांत तक्रार

Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाची प्रतीक्षा संपणार? बंगळूर एफसीविरुद्ध एफसी गोव्याची कसोटी; 3 गुणांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT