MS Dhoni-Sakshi Dhoni Love Story  Dainik Gomantak
मनोरंजन

MS Dhoni: साक्षीला 'या' ठिकाणी लपून-छपून भेटत होता धोनी; औरंगाबादमध्ये खुलली कॅप्टन कूलची प्रेमकहाणी

MS Dhoni love story: धोनीची प्रेमकथा महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात बहरली. हे तेच ठिकाण आहे जिथे धोनी साक्षीला भेटायला गुपचूप येत असे.

Akshata Chhatre

Dhoni-Sakshi Aurangabad Secret Meeting: आज भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. या खास दिवशी आम्ही तुम्हाला धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या प्रेमकथेबद्दल माहिती देत ​​आहोत. धोनीची प्रेमकथा महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात बहरली. हे तेच ठिकाण आहे जिथे धोनी साक्षीला भेटायला गुपचूप येत असे.

औरंगाबादेतील रेस्टॉरंटमध्ये झाली पहिली भेट

धोनींच्या पत्नीचे पूर्ण नाव साक्षी सिंग रावत आहे. जेव्हा दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली, तेव्हा साक्षी औरंगाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. तिच्या इन्स्टिट्यूटच्या बाजूला युसूफ खान नावाच्या व्यक्तीचे रेस्टॉरंट होते. युसूफ यांच्या म्हणण्यानुसार, साक्षी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये अनेकदा नाश्ता आणि जेवणासाठी यायची.

ती खूप मनमिळाऊ होती आणि तिची व युसूफच्या कुटुंबाची चांगली मैत्री झाली होती. धोनी जेव्हा औरंगाबादला आला, तेव्हा साक्षी त्यांना घेऊन युसूफच्या रेस्टॉरंटमध्ये आली होती आणि दोघेही इथे बराच वेळ थांबले होते. साक्षीने युसूफ यांची भेट धोनीशी करून दिली होती. साक्षीच्या लग्नाबद्दल कळल्यावर युसूफ यांनी तिला फोन करून शुभेच्छाही दिल्या होत्या.

तीन दिवस औरंगाबादेतील हॉटेलमध्ये थांबले होते धोनी

कॅप्टन कूल धोनी ११ मे २००८ रोजी कोणालाही न कळवता विमानाने दिल्लीहून औरंगाबादला पोहोचला. ते इथल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तीन दिवस थांबले होते. हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, धोनी १३ मे रोजी सकाळी ११ वाजता हॉटेलमधून बाहेर पडले. इथे मुक्कामादरम्यान ते बहुतेक वेळ आपल्या खोलीतच राहिले. ते जेवणही आपल्या खोलीतच मागवत असत.

ऑटोमधून साक्षीला भेटायला गेले होते धोनी

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मते, १२ मे २००८ रोजी धोनी हॉटेलमध्ये नाश्ता करून एका ऑटोमध्ये बसून साक्षीला भेटायला गेले होते. 'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातही याचा उल्लेख आहे. धोनी ज्या ऑटोवाल्याच्या रिक्षात बसले होते, त्याचे नाव सलेह चौष उर्फ ​​डेव्हिड आहे. डेव्हिड सध्या औरंगाबादमध्ये एक ट्रॅव्हल एजन्सी चालवतो.

डेव्हिड दिवसभर धोनीसोबत होता. डेव्हिड धोनी, साक्षी आणि तिच्या एका मैत्रिणीला घेऊन औरंगाबादमधील प्रसिद्ध 'बीबी का मकबरा' येथे फिरण्यासाठी घेऊन गेला होता. डेव्हिडच्या मते, तिघेही तिथे सुमारे दोन तास थांबले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT