MS Dhoni: "आता पुरे झालं म्हणण्याची वेळ आलीये का?" माजी फिरकीपटूचा कॅप्टन कूलला थेट सवाल

MS Dhoni IPL: भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक याला वाटतंय की या विश्वविजेत्या कर्णधाराने आता या T20 लीगमध्ये पुरेसा मुक्काम केला आहे
 Dhoni retirement
Dhoni retirementDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni IPL Retirement: चेन्नई सुपर किंग्जचा थाला म्हणजेच एमएस धोनीने पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायचं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी अजून ५-६ महिने असल्याचं म्हटलं असलं तरी, भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक याला वाटतंय की या विश्वविजेत्या कर्णधाराने आता या T20 लीगमध्ये पुरेसा मुक्काम केला आहे आणि महेंद्रसिंह धोनीने आता आयपीएल मधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ आहे.

पाच वेळा आयपीएल विजेत्या चेन्नईने रविवारी (दि.२५) नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध ८३ धावांनी दणदणीत विजय मिळवून आयपीएल २०२५ च्या हंगामाची विजयी सांगता केली. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये धोनीने पुढील आयपीएल खेळणार का? या प्रश्नाचं थेट उत्तर देणं टाळलं. केवळ ४३ वर्षीय धोनी इतकंच म्हणाला की, त्याला आता आपल्या रांची येथील मूळ गावी परत जाण्याची उत्सुकता आहे.

चेन्नईचा इतिहास, धोनीची कामगिरी

चेन्नईच्या इतिहासात पहिल्यांदाच ते १४ सामन्यांत केवळ आठ गुणांसह गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिले. धोनीच्या वैयक्तिक कामगिरीनेही बऱ्याच जणांच्या अपेक्षा भंग केल्या, कारण तो संघासाठी सामने फिनिश करू शकला नाही. काही प्रसंगी, तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कार्तिकचा थेट सवाल

धोनीच्या भवितव्याबद्दल बोलताना मुरली कार्तिक म्हणला, "जगाला धोनी कितीही प्रिय असला आणि काही गोष्टींचा आपल्याला शेवट नको असला तरी, एक दिवस असा येतो जेव्हा त्यांना संपवावंच लागतं.

 Dhoni retirement
IPL 2025: 'करामती खान'ला लय धुतलं, राशिदच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

कधीकधी काय होतं, की तुम्हाला कोणी आता पुरे झालं असं म्हटलेलं नको असतं, बरोबर ना? कधीकधी तर तुम्हाला प्रेम करणाऱ्यांनीही तुम्हाला 'तुम्ही आता जा' असं म्हटलेलं आवडत नाही. मग तो एमएस धोनी असो किंवा कोणीही."

कार्तिक पुढे म्हणाला, "आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर सगळे म्हणतात, 'अजून दोन-तीन वर्षे शिल्लक होती. तू ३६ वर्षांचा आहेस, खूप फिट आहेस.' पण धोनीच्या बाबतीत तुम्हाला काहीच कळत नाही. मी नेहमीच हेच म्हटलं आहे की, त्याच्या मनात काय चालले आहे, हे त्याच्या एका हातालाही कळत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्या मनात काय आहे, हे समजून घेणे खूप कठीण आहे."

धोनीच्या भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि त्याच्या चाहत्यांचा त्याच्यावरील अथांग प्रेम, या दोन्ही गोष्टींमुळे सध्या क्रिकेट वर्तुळात त्याच्या निवृत्तीबद्दलची चर्चा आणखी रंगत आहे. धोनी खरंच पुढील आयपीएलमध्ये खेळेल की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com