Mrunal Thakur  Dainik Gomantak
मनोरंजन

Mrunal Thakur Viral Photo : मृणाल ठाकूरला कसलं डिप्रेशन आलंय? त्या रडवेल्या फोटोवर म्हणाली हा शब्द...

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर टाकलेल्या रडवेल्या फोटोमुळे चर्चेत आहे.

Rahul sadolikar

मृणाल ठाकूर एक वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. आजवर तिने साकारलेल्या अनेक भूमीकांमधून अभिनयाची एक वेगळी शैली तिने प्रेक्षकांना दाखवली आहे. मृणाल सध्या तिच्या कामापेक्षा एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे, तिच्या या फोटोमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढल्या आहेत.

मृणालने एक रडवेला फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता त्यावर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे. तिला कसलं नैराश्य आलंय का या प्रश्नावर तिने चाहत्यांशी संवाद साधला आहे.

गेल्या महिन्यात, मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या 'भोळे' आणि 'असुरक्षित' असण्याबद्दल एक कमेंट केली होती. तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती रडत होती, त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

आता एका नवीन मुलाखतीत मृणालने तिच्या रडणाऱ्या फोटोबद्दल खुलासा केला आहे. तिने असेही म्हटले की सोशल मीडिया 'अस्तित्वात नसलेल्या जगाचा भ्रम देतो'.

Mrunal Thakur

“अशा काही वेळा असतात जेव्हा मी आनंदी फोटो पोस्ट करते, पण मला तसे वाटत नाही. ज्या दिवशी मी तो फोटो पोस्ट केला, तेव्हा मला जाग आली की मला सामर्थ्यवान, आनंदी आणि धैर्य या गोष्टी फिल केल्या आणि मला कळले की कोणतीही समस्या तुम्हाला आयुष्यात निराश करू शकत नाही. 

असे दिवस असतात जेव्हा आपण आपला स्वाभिमान, आत्मविश्वास गमावतो आणि आपण आपल्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उभे करतो. आत्म-शंका घेते. अशा जगात जिथे माहिती आणि मतांचा अतिरेक आहे, तुमच्या आजूबाजूला इतके आवाज आहेत की तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकणे थांबवता. जगासमोर असुरक्षित होण्यासाठी खूप धैर्य लागते,” मृणालने एका मुलाखतीत या गोष्टी शेअर केल्या .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT