Mrunal Thakur had this fear while shooting for Jersey

 

Dainik Gomantak

मनोरंजन

'जर्सी'च्या शूटिंगवेळी मृणाल ठाकूरला होती 'ही' भीती

दैनिक गोमन्तक

'जर्सी' (Jersey) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर पोहोचले होते. कपिल शर्माच्या संपूर्ण टीमने कलाकारांसोबत खूप मस्ती केली. मृणाल ठाकूरने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला सर्वात जास्त कशाची भीती वाटत होती हे सांगितले.

'द कपिल शर्मा शो'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) सांगितले की, एका टीव्ही सीरियलमधील एका सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने अभिनेत्याला थप्पड मारली, ज्यावर अभिनेता चांगलाच संतापला आणि तो देखील अभिनेत्रीवर चिडला. मृणालने सांगितले की, ते दृश्य त्याच्या डोक्यात बसले होते. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला शाहिदला (Shahid Kapoor) थप्पड मारावी लागली तेव्हा ती घाबरली होती.

कॉमेडी शोमध्ये कपिल शर्माने (Kapil Sharma) शाहिद कपूरला विचारले की लग्नानंतर तो किती बदलला आहे. शाहीद कपूरने उत्तर दिले की, लग्नापूर्वी मी स्टार होतो. त्याच बरोबर लग्नानंतर तो लाचार बिचारा झाला आहे, बायको-मुलं जे काही म्हणतील तेच करतो.

कपिल शर्माच्या (Kapil Sharma) लेटेस्ट एपिसोडमध्ये कपिल शर्माने कर्णधारपद सोडणाऱ्या विराट कोहलीचीही खिल्ली उडवली. खरं तर, चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकरने क्रिकेटची आवड व्यक्त केली, त्यानंतर चंदू म्हणाला, सर, तुमचा चित्रपट क्रिकेटवर येतोय, त्यामुळे मलाही क्रिकेटमध्ये रस आहे असं मला म्हणायचं आहे. यावर कपिल शर्मा म्हणतो की, जेव्हापासून यात रस घेतला तेव्हापासून विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आहे. कपिल शर्मा इतकं बोलताच शाहिद कपूर हसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT