Monica Bedi Dainik Gomantak
मनोरंजन

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेड्या झालेल्या अभिनेत्री तुम्हाला माहितीयेत का?

बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंधांमध्ये प्रत्येकाला रस असतो.

दैनिक गोमन्तक

Beauty And The Beast: बॉलीवूड सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंधांमध्ये प्रत्येकाला रस असतो. अभिनेत्री त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेकदा अभिनेत्यांच्या प्रेमात वेड्या झालेल्या दिसतात, तर काही क्रिकेटपटू किंवा उद्योगपतींना त्यांचे साथीदार म्हणून निवडतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही हिरोईन्सबद्दल सांगणार आहोत, ज्या अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेयसी बनल्या. अंडरवर्ल्ड डॉनसोबतच्या काही अभिनेत्रींच्या प्रेमकहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींनी लग्न केले तर काही प्रेमासाठी तुरुंगात गेल्या. अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात काही अभिनेत्रींचं करिअरही उद्ध्वस्त झालं. (Monica Bedi Abu Salem Daud Ibrahim Mandakini Hazi Mastan Actress And Under World love Story Actress Crazy)

दरम्यान, या यादीत पहिले नाव येते ते म्हणजे, अभिनेत्री मोनिका बेदीचे. मोनिका बेदी आणि अबू सालेम यांची प्रेमकहाणी खूप प्रसिद्ध आहे. अबू सालेमच्या प्रेमात हरवलेल्या मोनिका बेदीला तुरुंगाची हवा खावी लागली.

तसेच, अनिता अयुबचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले असून दोघांमध्ये खूप घनिष्ट संबंध होते. त्याचवेळी, रिपोर्ट्समध्ये या दोघांच्या नात्याबद्दल असंही सांगण्यात येत आहे की, एकदा जावेद सिद्दीकीने अनिताला आपल्या चित्रपटात (Movies) कास्ट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दाऊदने जावेद सिद्दिकीची हत्या केली होती.

दुसरीकडे, राम तेरी गंगा मैली या चित्रपटात आपल्या बोल्डनेसच्या जादूने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मंदाकिनीच्या प्रेमात दाऊद इब्राहिमही (Dawood Ibrahim) होता. दोघेही एका क्रिकेट सामन्यादरम्यान एकत्र दिसले होते. मात्र मंदाकिनीने दाऊदसोबत संबंध असल्याचे नाकारले होते.

शिवाय, ममता कुलकर्णी हे अल्पावधीतच बॉलीवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध नाव बनले होते. परंतु एका चुकीच्या नात्याने तिचे करिअर कायमचे उद्ध्वस्त झाले. हे नातं अंडरवर्ल्ड विकी गोस्वामीसोबत होते. ममतानेही विकीशी लग्नही केलं होतं. त्याचवेळी, एकदा ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली होती. दुसरीकडे, या यादीत अभिनेत्री सोनाचाही समावेश आहे. डॉन हाजी मस्तान पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता, असं म्हटलं जातं. त्यानंतर सोना आणि डॉनने लग्न केलं. परंतु लग्नानंतर काही दिवसातंच हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर ती एकाकी पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT