सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंड मनोरंजनाच्या जगात जबरदस्त पुनरागमन

सोमी अली 'फाईट ऑर फ्लाइट' या माहितीपट-मालिका घेऊन परतली आहे. तब्बल 22 वर्षांनंतर सोमी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर आली आहे.
Salman Khan's Girlfriend Somy Ali
Salman Khan's Girlfriend Somy AliDainik Gomantak

सलमान खानची गर्लफ्रेंड सोमी अली कमबॅक: सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मनोरंजन विश्वात जबरदस्त पुनरागमन केले आहे. खूप सुंदर आणि एकेकाळी बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण करणारी, सलमानची जी गर्लफ्रेंड आहे ती म्हणजे सोमी अली.

(Salman Khan's ex-girlfriend makes a comeback in the world of entertainment)

Salman Khan's Girlfriend Somy Ali
Shilpa Shetty Birthday: शिल्पा शेट्टीचा ट्रॅडिशनल अवतार

पाकिस्तानी-अमेरिकन सोमी अली एक अभिनेत्री तसेच मॉडेल, लेखक, चित्रपट निर्माती आहे. सोमी अली 'फाईट ऑर फ्लाइट' या माहितीपट-मालिका घेऊन परतली आहे. तब्बल 22 वर्षांनंतर सोमी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर आली आहे.

'फाईट ऑर फ्लाइट' घरगुती हिंसाचार आणि लैंगिक तस्करीच्या बळींना संरक्षण देण्यासाठी किंवा टाळण्याच्या उपायांवर भर देते. या मालिकेला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने सांगितले की, ती या माहितीपट-मालिका 'फाईट ऑर फ्लाइट'साठी खूप उत्सुक आहे.

Salman Khan's Girlfriend Somy Ali
Photo: समंथाने रिवीलिंग रेड टॉप आणि पिंक प्लाजोमध्ये शेअर केला बोल्ड लुक

मुलाखतीदरम्यान सोमी म्हणते, 'मी 22 वर्षांनंतर कॅमेऱ्या सामोर आले, पण हिंदी चित्रपटातील अभिनयापेक्षा वेगळे वाटले कारण मला माझी खरी सोमी असण्याचे स्वातंत्र्य होते.

त्यांच्या 'नो मोअर टीयर्स' या संस्थेला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ती खूप खूश आहे. सोमी पुढे म्हणते की, मला संपूर्ण अमेरिकेतून मिळत असलेल्या प्रतिसादावर विश्वास बसत नाही. सलमान आणि सोमीबद्दल बोलायचे झाले तर 'मैने प्यार किया' चित्रपट पाहिल्यानंतर सोमी अली सलमान खानच्या प्रेमात पडली. एका मुलाखतीत सोमी अलीने स्वतः सांगितले होते की, ती सलमान खानवर इतके प्रेम होते की तिला त्याच्याशी लग्न करायचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com