Mohammed Rafi  Dainik Gomantak
मनोरंजन

Mohammed Rafi : अन् रफी साहेबांनी 16 हजार परत दिले, अभिनेते जितेंद्र यांनी सांगितलेला तो जुना किस्सा..

महान गायक मोहम्मद रफी यांच्या सच्चेपणा सांगणारा एक किस्सा अभिनेते जितेंद्र यांनी सांगितला होता.

Rahul sadolikar

आपल्या मखमली आवाजाने जगाला वेड लावणाऱ्या महान गायक मोहम्मद रफी यांची आज जयंती. एक गायक म्हणुन रफी साहेब थोर होतेच पण त्याचबरोबर एक माणुस म्हणुनही रफी साहेबांनी आपली मुल्ये जपली होती आणि शेवटपर्यंत त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही.

केवळ पैसे मिळतात म्हणुन त्यांनी कधीच गाणी गायली नाहीत तर त्यांचं आयुष्य कलेशी एकरुप झालं होतं.

रफी साहेबांचा माणुस म्हणुन मोठेपणा सांगणारा एक किस्सा ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी काही काळापुर्वी एका खाजगी कार्यक्रमात सांगितला होता. पैशापेक्षा रफी साहेब मुल्यांना जास्त महत्त्व देत होते हेच या किश्श्यातून आपल्याला समजतं.

मोहम्मद रफी यांनी अभिनेता जितेंद्र यांच्या दिदार - ए- यार या चित्रपटासाठी गाणं गायलं यात त्यांच्यासोबत किशोर कुमार सुद्धा होते. चित्रपटाची सगळी प्रोसेस पुर्ण झाल्यावर प्रॉडक्शनमधुन अभिनेते जितेंद्र यांना रफी साहेबांंना किती पैसे द्यायचे हे विचारलं गेलं. तेव्हा जितेंद्र यांनी किशोर कुमार यांना जेवढे पैसे दिलेत तेवढेच रफी साहेबांना द्या असं सांगितलं आणि ते निघुन गेले.

किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांना दिलेली रक्कम ही 20 हजार इतकी होती. जितेंद्र प्रॉडक्शनला पैसे द्यायला सांगुन घरी गेले. पण थोड्याच वेळात रफी साहेबांचे मेहुणे जे त्यांचे मॅनेजर होते, ते जितेंद्र यांच्या घरी आले आणि त्यांनी जितेंद्र यांच्याशी रफी साहेबांना बोलायचं आहे असं सांगितले. लगेच जितेंद्र यांनी रफी साहेबांना फोन केला.

समोरुन रफी साहेब बोलत होते ते म्हणाले त्यांना मिळालेली रक्कम खुप जास्त होती, त्यामुळे त्या 20 हजार रुपयांपैकी केवळ 4 हजार रुपये स्वत:जवळ ठेवत बाकीचे 16 हजार रुपये मॅनेजरकडुन जितेंद्र यांच्याकडे पाठवले आहेत. हा किस्सा सांगुन झाल्यावर जितेंद्र म्हणाले होते हे खऱ्या कलाकाराचे लक्षण आहे.

मोहम्मद रफी साहेबांसारखे कलाकार आजही आदराने आठवले जातात. त्याचं कारण कदाचित हेच आहे कि कलाकार म्हणुन ते थोर होतेच पण त्याचबरोबर एक माणुस म्हणुनसुद्धा थोर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

SCROLL FOR NEXT