रोहित शेट्टीच्या सर्कसचा ट्रेलर रिलीज झाल्यापासुन प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती ;पण शुक्रवारी रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.
सलग सुपरहिट चित्रपट देण्याचा फॉर्म्युला अवगत असलेला रोहित शेट्टी या चित्रपटाच्या माध्यमातुन बऱ्याच काळाने कॉमेडीचा तडका घेऊन येणार असं वाटत होतं पण प्रेक्षकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे कारण चित्रपटाची कमाई अत्यंत तोकडी आहे.
रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस, जॉनी लिवर, संजय मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट असुनही रोहित शेट्टीचा सर्कस बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करु शकला नाही. 'सर्कस'ला ३२०० स्क्रिन्स मिळाल्या असुन देशभरात १० हजार शोज लागले आहेत. या सर्वांचा विचार करता 'सर्कस पहिल्या दिवशी ८ ते 10 कोटींचा गल्ला जमवेल असं वाटलं होतं.
सर्कसच्या कमाईबाबतचा हा अंदाज चुकला असुन चित्रपटाने केवळ ६.७५ इतकाच गल्ला जमवला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट, प्रमोशन या सगळ्याचा विचार करता ही कमाई अत्यंत तोकडी आहे. 70 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट आता कशी वसुली करतो हे पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या कमाईतुन लक्षात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.