Milind Soman
Milind Soman dainik gomantak
मनोरंजन

Milind Soman : मिलिंदचं फोटोशूट वादाच्या भोवऱ्यात; याआधीही झाला होता ट्रोल

गोमन्तक डिजिटल टीम

Milind Soman : मिलिंद सोमण म्हटलं की त्याठिकाणी वाद आलाच, हे जसंकाही एक समीकरणच झालं आहे. नेहमीच चर्चेत राहणारा मिलिंद आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे. विम डिशवॉशच्या एका जाहिरातीमुळे मिलिंद सोमण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. जीम करताना एक तरुण आपण आईला भांडी घासण्यास मदत केल्याचे सांगतो. आणि यामुळे फार थकल्याचंही बोलतो. त्या मुलाची ही गोष्ट ती गोष्ट मिलिंदनं ऐकल्यानंतर त्याला त्या नवीन भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमच्या साबणाची माहिती देतो. व्हिम ब्लॅक लिक्विडमुळे त्या मुलाला भांडी घासायला काहीही अडचण येणार नाही, असं या जाहिरातीत मिलिंद सांगताना दिसतोय. याचा व्हिडिओही मिलिंदने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आणि यानंतर मिलिंद चांगलाच ट्रोल झाला आहे.

दरम्यान मिलिंद सोमणच्या बाबतीत वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की मिलिंद सोमणवर 2020 मध्ये गोव्यात गुन्हा दाखल झाला होता. सोशल मीडियावर मिलिंदने आपला एक नग्न फोटो शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गोव्यातील एका बीचवर विवस्त्र धावतानाचा एक फोटो मिलिंदने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मिलिंदवर कलम 294 आणि 67 खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेहमीच चर्चेत राहणारा मिलिंद सोमण गोव्यात आल्यावरही चांगलाच चर्चेत राहिला होता. गोव्यातील एका बीचवर कपड्यांशिवाय धावत असताना मिलिंदने फोटोशूट केलं होतं. यातलाच एक व्हिडीओ मिलिंदने सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे दक्षिण गोव्यातील कोलवा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षा मंच नावाच्या एका संस्थेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT