Michelle Yeoh Dainik Gomantak
मनोरंजन

Michelle Yeoh Wins Oscar: मिशेल यो यांनी रचला इतिहास! ऑस्कर पटकावणारी पहिली आशियाई महिला

Michelle Yeoh Wins Oscar: एवरीथिंग एवरीव्हेयर ऑल एट वंस या चित्रपटाने सात श्रेणीमध्ये पुरस्कार पटकावला आहे.

दैनिक गोमन्तक

Michelle Yeoh Wins Oscar: 95 व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. भारताने दोन ऑस्कर पुरस्कार आपल्या नावावर करणे ही भारतासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. जगभरातून आरआरआर आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

अमेरिकेत पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एवरीथिंग एवरीव्हेयर ऑल एट वंस'ने बाजी मारली आहे. एवरीथिंग एवरीव्हेयर ऑल एट वंस या चित्रपटाने सात श्रेणीमध्ये पुरस्कार पटकावला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री मिशेल यो मुख्य भूमिकेत दिसून आली होती. मिशेल यो ला देखील सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर मिशेल यो यांनी इतिहास रचला आहे. हा पुरस्कार आपल्या नावावर करणारी मिशेल यो ही पहिली आशियाई अभिनेत्री आहे.

मलेशियात जन्मलेल्या मिशेलने आपल्या अॅक्टींग करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 1990च्या दशकातल्या हॉंगकॉंगमधील अॅक्शन चित्रपटात त्यांनी काम केले. या सर्व चित्रपटात त्यांनी स्वता अॅक्शन सीन केले होते.

विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट मार्शल आर्ट चा प्रभाव असणारे होते. मिशेल यो यांनी मार्शल आर्टचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना त्यांनी अॅक्शन सीन केले होते.

यामध्ये एस मॅडम (1985), पुलिस स्टोरी 3: सुपरकॉप (1992) आणि होली वेपन (1993) सारखे चित्रपट सामील आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉन्डच्या टुमारो नेव्हर डाइस' या चित्रपटानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली.

एवरीथिंग एवरीव्हेयर ऑल एट वंस' चित्रपटाने तर जगभरात वेगळी ओळख निर्माण केली. एवरीथिंग एवरीव्हेयर ऑल एट वंस' साठी मिशेल यो यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे आणि आता त्यांनी ऑस्कर आपल्या नावावर केला आहे.

भविष्यात त्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाल्या आहेत. मिशेल यो आपल्या अ हॉन्टिंग इन वेनिस', 'अवतार 3, 4' आणि 'विकेंड पार्ट 1, 2 या चित्रपटात अभिनयाची जादू दाखवताना पून्हा एकदा दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Elections: फातोर्ड्यासह मडगावातील पालिका प्रभागांतही निवडणूक लढवू - विजय सरदेसाई

Marigold Flowers: झेंडू फुलांच्या मागणीत वाढ, लागवडीवर कृषी खात्याचा जोर; 3 वर्षांत 23.77 कोटी फुलांची आयात

Operation Flushout: ऑपरेशन फ्लशआऊट! गोव्यातील हरमल येथून रशियन नागरिकाला अटक

Valpoi: 'बाप्पाला बसवणार कुठे?' वेळूस येथील वृद्धेला मदतीची आस; घर कोसळण्याच्या स्थितीत, मुलाचीही तब्येत बिघडलेली

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

SCROLL FOR NEXT