Dancing legend Michael Jackson Flickr
मनोरंजन

Michael Jackson Death Anniversary: जॅक्सनच्या निधनानंतर इंटरनेट क्रॅश झालं होतं

Dainik Gomantak

Michael Jackson Death Anniversary: मायकल जॅक्सन (Michael Jackson) आज या जगात आपल्याबरोबर नाही. परंतु आजही ते संपूर्ण जगभर ओळखले जाते. त्यांनी आपल्या डान्स (Dance) ने जगाला वेड लावलं होतं. त्यांमुळे पिढ्यान् पिढ्या त्यांचे नाव अजरामरच राहणार आहे, अस म्हणायला हरकत नाही. 1964 मध्ये ते आपल्या कुटूंबाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला. जॅकसन फाइव्ह असे या ग्रुपचे नाव होते. पण जेव्हा मायकल जॅक्सनचा प्रसिध्दीचा काळ आला तेव्हा त्यांनी सर्वांना मागे सोडले. आज त्यांची पुण्यतिथी आहे. या खास प्रसंगी त्याच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.(Michael Jackson Death Anniversary Internet was crashed after Jackson's death)

1) मायकल जॅक्सन पहिल्यांदाच शिवसेनेच्या निमंत्रणानंतर मुंबईला आले होते. जेथे विमानतळावर त्याचे सोनाली बेंद्रे यांनी स्वागत केले होते. त्या काळात बॉलिवूडमधीलच नव्हे तर दक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीज त्यांना भेटायला आले होते.

2) मायकल जॅक्सनचा 'थ्रिलर' हा आतापर्यंतचा सर्वाधिक विकला गेलेला अल्बम आहे.

3) मायकल जॅक्सनचे बरेच संबध वादग्रस्त होते. लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांना देखील त्यांना सामोरे जावं लागलं होतं. 2002 मध्ये मुलाला बाल्कनीच्या बाहेर लटकवल्याची मोठी चर्चा झाली होती. आणि त्यामुळे मायकल चर्चेत आले होते. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली त्यांना दोन दिवसाची तुरूंगावासाची शिक्षाही झाली होती.

4) मायकल जॅक्सन जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन चेंबरमध्ये झोपायचे, असं म्हटलं जातं की, असे केल्याने आपले शरीर चांगले सुदृढ राहते आणि आपले आयुष्यही वाढते.

5) एचआयव्ही/एड्सच्या विविध कारणांना मदत करण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे जॅक्सन यांना माजी अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी मानवतावादी पुरस्कार जाहीर केला होता.

मायकल जॅक्सनचा दुखद मृत्यू

6) मार्च 2009 मध्ये, मायकल जॅक्सन म्हणाले होते की "दिस इज इट" ही त्यांची शेवटची मैफल असेल. मायकल या नंतर कोणतीही मैफिली करणार नाही. मात्र 25 जून, 2009 रोजी माईकल यांचा हा कंसर्ट करण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

7) मायकल जॅक्सन यांच्या निधनानंतर इंटरनेट क्रॅश झाले होते. पॉप स्टारच्या मृत्यूची बातमी दुपारी 3:15 वाजता माहिती झाली होती. ज्यानंतर विकिपीडिया, एओएल आणि ट्विटर एकावेळी क्रॅश झाले होते.

8) मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दोनदा पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला होता. कारण मायकल यांची हत्या झल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते.

9) असे म्हणतात की, मायकलच्या पोस्टमॉर्टम अहवालात त्यांच्या शरीरावर सुईच्या खुणा आढळल्या होत्या. मृत्यूच्या काही तासांपूर्वीच त्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्स घेतले होते असेही सांगितले जाते.

10) मायकल जॅक्सनचा अंत्यविधी सर्वत्र थेट दाखविला गेला होता, ज्यास सुमारे अडीच अब्ज लोकांनी थेट पाहिले होते. हे आतापर्यंतचे सर्वाधिक पाहिलेल्या गेलेले थेट प्रक्षेपण होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT