Meeting with Pol Pot Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2024: सत्य आणि काल्पनिकतेची सांगड; ‘मिटिंग विथ पोल पॉट’

Meeting with Pol Pot: पोल पॉट हा कंबोडियातील हुकूमशहा होता. १९७६ ते १९७९ या काळात ते कंबोडियाचे पंतप्रधान देखील होते. फ्रान्समधून तीन पत्रकार पोल पॉट यांना भेटायला, त्यांची मुलाखत घ्यायला येतात आणि त्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडतात, यावर हा चित्रपट आधारित आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

पोल पॉट हा कंबोडियातील हुकूमशहा होता. १९७६ ते १९७९ या काळात ते कंबोडियाचे पंतप्रधान देखील होते. फ्रान्समधून तीन पत्रकार पोल पॉट यांना भेटायला, त्यांची मुलाखत घ्यायला येतात आणि त्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडतात, यावर हा चित्रपट आधारित आहे. सत्य घटना आणि थोड्या काल्पनिक घटना यांची सांगड घालून चित्रपट बनवण्यात आला आहे.

दिग्दर्शक रिथी पन्हा यांचा हा ‘मिटिंग विथ पोल पॉट’ चित्रपट राजकीय, सामाजिक परिमाण विविध स्तरांमधून प्रकट झाला आहे. अमेरिकन युद्ध पत्रकार एलिझाबेथ बेकर यांनी लिहिलेल्या वास्तव घटनांवर आधारित हा चित्रपट जेवढा पोल पॉट यांच्याबद्दल आहे, तेवढाच तो पत्रकारितेतील मूल्यांवर भाष्य करतो.

१९७८ मध्ये कंबोडियन हुकूमशहा पोल पॉटची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन फ्रेंच पत्रकारांची काल्पनिक कथा तयार केली असली तरी त्यातील महत्त्‍वाचा पाया बेकर यांच्या वास्तविक अनुभवांवर आहे. सत्य आणि असत्य यातील ही भरीव गतिमानता देखील दिग्दर्शक पन्हा यांच्या सौंदर्यात्मक दृष्‍टिकोनाने मूर्त स्वरूपात साकार झाली आहे.

काल्पनिक नाट्यीकरणाच्या मुख्य क्षणांदरम्यान वास्तवातील किंवा सुपरइम्पोज केलेल्या आर्काइव्हल फिल्म आणि छायाचित्रांवर दिग्दर्शक अवलंबून असतो. जेव्हा पत्रकार डेल्बे आणि पॉल थॉमस गुप्तपणे त्यांचे कॅमेरे बाहेर काढतात, तेव्हा त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती बदलते. पोल पॉटचे सहकारी त्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणतात.

आज कंबोडिया महत्त्‍वाचे पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर आहे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्‍याला कंबोडियन नरसंहाराच्या इतिहासात डोकावता येते. तीन पत्रकारांच्या गटातील कॅरिओ हा अन्य दोघांपेक्षा वेगळा आहे. कंबोडियाशी जवळून परिचित असणारा, तो पोल पॉटपर्यंत पोहोचविणारा महत्त्‍वाचा दुवा देखील असतो. पोल पॉट याचा महाविद्यालयीन वर्गमित्र असल्याने कॅरिओने स्वतः पॉटशी लिखित पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. त्याची सुरुवातीस एकूणच मवाळ भूमिका बघून पोल पॉट याला न भेटताच हा परत जाणार असे वाटत राहते.

चित्रपटाचा विषय अवघड आहे. जिथे वास्तव दाखवण्यासाठी छायाचित्रण उपलब्ध नाही, तेथे दिग्दर्शक पन्हा यांनी लघुचित्रांचा वापर करून अशा दृश्यांना चित्रित केले आहे. या दृश्यांचा अतिशय प्रत्ययकारी अनुभव आला. पन्हा या चित्रपटाच्या काही भागाला सशस्त्र घडामोडींमुळे भयपट बनवतात. त्‍यांचे लांबलचक क्लोजअप्स एकाच वेळी मोहक आणि अस्वस्थ करणारे आहेत. पत्रकारितेच्या सचोटीचा, बलिदानाचा, विश्वासार्हतेचा मागोवा हा चित्रपट घेतो.

मैत्री तुटते, गोळ्‍या घातल्‍या जातात!

या तीन पत्रकारांमधील पॉल हा कॅरिओची मवाळ भूमिका बघून ‘‘आम्ही इथं त्यांच्या आदरातिथ्याचा, पर्यटनाचा आनंद लुटायला आलेलो नाही. आपण पत्रकार आहोत. डोळ्यांसमोर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना आपण त्यावर बोलायचं नाही हे चुकीचं आहे’’ असे खडसावून सांगतो. चित्रपट वास्तवाच्या दिशेने जाऊ लागतो. पोल पॉट आपला मित्र आहे. आपल्याला येथे काही धोका नाही असा गैरसमज असलेला कॅरिओ जेव्हा प्रत्यक्ष पोल पॉटला भेटतो आणि जहाल प्रश्‍‍न विचारू लागतो तेव्हा मैत्रीपूर्ण वातावरण तुटतं. कॅरिओला अटक होते आणि गोळ्या घालून मारले जाते. मैत्री, विश्‍‍वासार्हता सगळी संपते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT