Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Amit Patkar: पाटकर म्हणाले, आमच्या आमदारांनी वीज खात्यात वर्षनिहाय थकीत रकमेची सविस्तर माहिती मागितली. त्यात खात्याने २०२१ ते २०२५ पर्यंत आकडेवारी दिली आहे.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्याने वीज दर वाढविण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो महसुली तूट भरून काढण्यासाठी आहे. मात्र, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बिलाची रक्कम थकीत आहे, त्यांच्याकडून ती वसूल केली जात नाही. या खात्याचे सर्वात जास्त थकीत सरकारी खाती असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याशिवाय स्वतः वीज खातेच ७४.८२ कोटींचे थकीत असल्याची माहिती वीज मंत्र्यांनी काँग्रेस आमदारांच्या लेखी प्रश्नाला उत्तरात दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

काँग्रेस भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व इतरांची उपस्थिती होती.

पाटकर म्हणाले, आमच्या आमदारांनी वीज खात्यात वर्षनिहाय थकीत रकमेची सविस्तर माहिती मागितली. त्यात खात्याने २०२१ ते २०२५ पर्यंत आकडेवारी दिली आहे. त्यात त्या रकमेची बेरीज केल्यास एकूण थकीत रक्कम ६०६.६५ कोटी रुपये होते,

पण येथे ५७२.२४ कोटी रुपये दाखविले आहेत. त्यामुळे सुमारे ३४ कोटी रुपये खाल्ले. वीज मंत्री आणि मुख्य अभियंत्यांनी ही ३४ कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले, याचे उत्तर द्यावे. बिलांविषयी न्यायालयात जे कोण गेले आहेत, ती रक्कम २२७.२३ कोटी दाखविले आहे.

Amit Patkar
Goa Assembly: 'कृषी पर्यटनाला चालना, 7 क्लस्टरची स्थापना होणार'; विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

ते पुढे म्हणाले, खात्याने महसूल तूट भरून काढण्यासाठी दर वाढ करीत असल्याचे संयुक्त वीज नियामक आयोगाला (जेईआरसी) कळविले आहे. त्यात म्हटले आहे, पुढील पाच वर्षांतील एकूण महसूल आवश्यकता (एआरआर) व सध्याच्या दरातून मिळणारे उत्पन्न (आरएफएटीआर) दाखविले आहे.

Amit Patkar
Goa Assembly: 'काजू आधारभूत दर 200 रुपये करावा'! आमदार राणेंची सूचना; नारळ उत्पादनाकडेही वेधले लक्ष

त्यामध्ये २०२५-२६ मध्ये एआरआर ३४९०.७३ कोटी दाखविले आहे, तर आरएफएटीआर ३०८१.९७ कोटी दाखविली आहे, म्हणजेच ४०८.७६ कोटी तूट दाखविली आहे. २०२६-२७ साठी एआरआर ३९५६.६६ कोटी-आरएफएटीआर ३,७६७.९५ कोटी महसूल दाखविला असून, त्यात १८८.७१ कोटींची तूट आहे.

२०२७-२८ साठी एआरआर ४,४६५.७३ कोटी-आरएफएटीआर ४,३६९.५९ कोटी महसूल दाखविला असून, त्यात ९६.१४ कोटींची तूट आहे. २०२८-२९ साठी एआरआर ५,०२६.८६ कोटी-आरएफएटीआर ५,०७१.९१ कोटी महसूल दाखविला असून, त्यात ४४.९५ कोटींची तूट आहे आणि २०२९-३० साठी एआरआर ५,६२५.५४ कोटी-आरएफएटीआर ५,७५३.०४ कोटी महसूल दाखविला असून, त्यात १२७.५ कोटींची तूट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com