meet ranveer singh film jayeshbhai jordar actress shalini pandey gets limelight at trailer launch Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेत्री शालिनी पांडेने केला मोठा खुलासा

चित्रपटात काम करायचं होत म्हणून घरातून पळून आले, पण...

दैनिक गोमन्तक

मुंबई : नुकताच अभिनेता रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार'चा ट्रेलर झाला आहे. काल मुंबईत हा चित्रपट लाँच करताना अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री शालिनी पांडे यांच्यासह चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक देखील उपस्थित होते. (meet ranveer singh film jayeshbhai actress shalini pandey gets limelight at trailer launch)

यावेळी रणवीर सिंगने चित्रपटातील अभिनेत्री शालिनीबाबत मीडियासमोर एक मोठा खुलासा केला. यावेळी रणवीरने सांगितले की, त्याच्या 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाची नायिका म्हणजेच शालिनी पांडे खऱ्या आयुष्यातही खूप फिल्मी आहे. शालिनीला चित्रपटात अभिनय करायचा होता म्हणून अक्षरशः ती घरातून पळून मुंबईत आली आहे. चित्रपटात काम करायचं म्हणून घर सोडलं. दरम्यान रणबीरच्या या खुलाशावर शालिनी उत्तर दिलं..

शालिनी म्हणाली की "हो मी चित्रपटात काम करायचं होत म्हणून घरातून पळून आले; पण रणवीर ज्या पद्धतीने सांगत आहे ते इतके सोपं नव्हतं. मला या काळात खूप टेन्शनमध्ये राहावे लागले आणि घर सोडण्याचा निर्णय कोणासाठीही सोपा नाही.

पुढे ती म्हणाली की, खरं तर मला अभ्यासात मजा येत नव्हती आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं. पण माझ्या कुटुंबीयांची वडिलांची आणि इच्छा होती की मी इंजिनिअर व्हावे. खरतर मी आयआयटीची विद्यार्थिनी होते. विशेष म्हणजे मला इंजिनीअरिंगला प्रवेशही मिळाला होता. मग मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. कारण, मुंबईला पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग होता, म्हणून मी निर्णय घेतला आणि घर सोडले आणि मुंबईला आले. घरच्यांचा राग होता. कारण अभ्यास मधेच सोडून मुंबईतच करिअर केलं.

यशराजच्या चित्रपटात काम म्हणजे केकवर आयसिंग करण्याचा विषय

खरतर ते दिवस खूप अवघड होते, पण यशराजचा 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट आला तेव्हा घरच्यांची नाराजीही दूर झाली. आता सगळे आनंदी आहेत. त्यांना वाटते की मी काहीतरी चांगलं काम करतेय कारण मी स्वतः यशला बघतच मोठी झाले आहे.

माझ्या पहिल्याच चित्रपटात बॉलीवूडमधील यशराजच्या चित्रपटात काम करणे, हे म्हणजे केकवर आयसिंग करण्याचा विषय ठरला. पण हेही खरे आहे की मला यशराजची साथ मिळाली, नाही तर माझे कुटुंबाची नाराजी आणि माझा संघर्ष हा वेगळ्या पातळीवरचा असता. एकूणच माझा घरातून पळून जाण्याचा माझा प्रवास सुंदर झाला आहे, अस देखील शालिनी पांडे म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT