गुणरत्न सदावर्तेंवर आता सोलापुरातही गुन्हा दाखल

आतापर्यंत कुठे कुठे गुन्ह्याची नोंद?
Gunaratne Sadavarte News
Gunaratne Sadavarte NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली दिल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलीसांनी त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातील एका प्रकरणात सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला आहे. तर दुसरीकडे सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत योगेश नागनाथ पवार (वय 38, रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ यांनी तक्रार दिली आहे. (case has been registered against gunaratna sadavarte in solapur)

आतापर्यंत कुठे कुठे गुन्ह्याची नोंद?

दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम 153 (अ) नुसार कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.

एसटी आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याप्रकरणी अकोट शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्याविरोधात शिवसेनाप्रणित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी 8 जानेवारी 2022 रोजी अकोट (अकोला) पोलिसात तक्रार दिली होती.

Gunaratne Sadavarte News
गुणरत्न सदावर्तेंच्या घरात पैसे मोजण्याचं मशीन; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र निकम यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अॅड गुणरत्न सदावर्तेला अटक करण्यात आली. जर त्यावेळी अटक झाली असती तर सिल्वर ओकवरील हल्ला झाला नसता अस मत फिर्यादी निकम यांनी व्यक्त केलं.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नापसंती दर्शवत निर्णयावर शंका घेत, न्यायाधीशांविषयी अवमानकारक भाषा वापरल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोल्हापूर पोलीसांनी त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला आहे. दरम्यान, सातारा 2020 मधील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com