Meena Kumari Birth Anniversary Dainik Gomantak
मनोरंजन

Meena Kumari Birth Anniversary : सौंदर्य आणि लोकप्रियता असुनही तिने एकटेपणात घालवलं आयुष्य...प्रेमातलं अपयश वेदनादायी मृत्यू

एकेकाळी बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याने वेड लावणाऱ्या मीना कुमारीचा शेवट खूपच वेदनादायी झाला..

Rahul sadolikar

बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री मीना कुमारीचा 1 ऑगस्ट रोजी जन्मदिवस आहे. तिच्या आयुष्यात जितकं प्रेम मिळालं तितकाच तिचा शेवटही एकटेपणाने भरून गेलं. मीना कुमारीचा शेवट कुठल्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. चला पाहुया बॉलीवूडच्या या ट्रॅजेडी क्वीनचं आयुष्य जे एकटेपणा आणि वेदनांनी भरलेलं होतं.

मीना कुमारीचं आयुष्य

बॉलिवूडची 'ट्रॅजेडी क्वीन' अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही.. ती अशी अभिनेत्री आहे जी कायमची अमर झाली ,ती अमर झाली कारण तिचं विलक्षण आयुष्य कुठल्याही अभिनेत्रीच्या वाट्याला आलं नाही. बॉलीवूडने मीना कुमारीला 'ट्रॅजेडी क्वीन' ही पदवी दिली, पण प्रत्यक्षात मीना कुमारीचे आयुष्य 'ट्रॅजेडी'पेक्षा कमी नव्हते. तिच्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी आजही एका दंतकथेसारख्या वाटतात.

मीना कुमारीचं करिअर

मीना कुमारीच्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. वास्तविक कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना लहान वयातच चित्रपटात काम करावे लागले. मीना यांनी 1939 मध्ये 'लेदरफेस' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते, तेव्हा ती फक्त सहा वर्षांची होती. मीनाला पुढच्या सहा-सात वर्षांत म्हणजे 13-14 वर्षांत नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. तुम्हाला माहीत नसेल पण मीना कुमारीने काही गाणीही गायली आहेत. विजय भट्ट यांनी तिला 'बैजू बावरा'मध्ये मुख्य भूमिका देऊन प्रसिद्धीच्या झोतात आणले.

दिग्दर्शक कमाल अमरोहीशी लग्न

मीना कुमारीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. असे म्हटले जाते की दिलीप कुमारपासून राजकुमारपर्यंत सर्व कलाकार तिच्यासमोर संवाद विसरायचे. ‘पाकीजा’मध्ये मीना कुमारीसोबत ट्रेनमधील सीन शूट करत असताना राजकुमार मीरा कुमारीला पाहून प्रेमात पडला.

मीना कुमारी खूप सुंदर होत्या. अनेक कलाकार तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत. पण मीना कुमारीचे मन प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यावर जडले. कमलवर त्यांचे खूप प्रेम होते. ती कमलच्या प्रेमात इतका पडली होती की दोघांनी लग्न केले.

कमलशी घटस्फोट अन् धर्मेंद्रशी जवळीक

मीना ही कुमारी कमल यांची दुसरी पत्नी होती. दोघेही दहा वर्षे एकत्र राहिले. पण कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि मीना कुमारी 1964 मध्ये कमलपासून विभक्त झाली. या विभक्त होण्यामागे धर्मेंद्र कारणीभूत होते. त्यावेळी मीना कुमारी यशाच्या शिखरावर होत्या तर धर्मेंद्र त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. 

धर्मेंद्रने धमकी दिली... दारुचे व्यसन अन् दु;खद शेवट

धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीला सुरुवात होताच मीना कुमारी त्यांच्या जवळ आल्या आणि प्रेमात पडल्या. पण बदल्यात त्याला एकटेपणा मिळाला. 'फूल और कांटे'च्या अफाट यशानंतर धर्मेंद्र मीना कुमारीपासून दूर जाऊ लागला आणि मीना कुमारी एकाकी पडल्या. धर्मेंद्रने दिलेली 'धमकी' मीना कुमारींना सहन होत नव्हती.

मीना कुमारी हा अपमान शेवटपर्यंत विसरू शकल्या नाहीत. धर्मेंद्रपासून वेगळे होणे तिला सहन होत नव्हते. यादरम्यान तिला दारूचे व्यसन लागले. जास्त मद्यपान केल्याने त्यांचे यकृत खराब झाले होते. मीना कुमारी खूप सुंदर आणि तितकीच लोकप्रिय होती पण खऱ्या आयुष्यात तिला आधारासाठी संघर्ष करावा लागला. त्यांचे आयुष्य एकाकीपणात गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT