Piracy Bill in Rajysabha: पायरसीला चाप लावण्यासाठी राज्यसभेत विधेयक मंजूर..जाणून नेमका कसा असणार कायदा?

सिनेमाच्या पायरसीचा म्हणजेच चोरीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत होता, त्यावर आता राज्यसभेत विधेयक मंजूर झाले आहे.
Piracy Bill in Rajysabha
Piracy Bill in RajysabhaDainik Gomantak

Piracy Bill in Rajysabha: सिनेमा कोणताही भाषेतला असो. पायरसीमुळे सिनेमा इंडस्ट्रीला धक्का बसलाय. याच पायरसीला चाप बसवण्यासाठी गुरुवारी राज्यसभेत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

चित्रपट उद्योगाला मदत करण्यासाठी, चित्रपटांच्या पायरसीला आळा घालण्यासाठी आणि सिनेमा परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक दुरुस्ती विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले.

सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 मध्ये सुधारणा करणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे.

पायरसीला बसणार आळा

आता या विधेयकामुळे चित्रपटांच्या पायरसीला आळा घालण्यास मदत होणार आहे. या विधेयकात सरकारने चित्रपटांच्या पायरेटेड कॉपी बनवणाऱ्यांना जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आणि चित्रपटाच्या निर्मिती खर्चाच्या पाच टक्के दंडाची तरतूद प्रस्तावित केली आहे.

सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक-2023 मध्ये चित्रपटांना असलेला 10 वर्षांचा वैधता कालावधी काढून टाकून कायमस्वरूपी वैधता असलेल्या चित्रपटांना प्रमाणपत्रे देण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) परवानगी देण्याचाही प्रस्ताव आहे.

UA सर्टिफिकेटबद्दल

या विधेयकात 'UA' श्रेणी अंतर्गत तीन आयु-आधारित प्रमाणपत्रे सादर करण्याची तरतूद आहे, म्हणजेच 'UA 7+', 'UA 13+' आणि 'UA 16+' आणि CBFC ला टेलिव्हिजनवर किंवा अन्य माध्यमात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांना वेगळे प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

सिनेमॅटोग्राफ कायदा

चित्रपट पायरसीला आळा घालण्यासाठी, या विधेयकात सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये नवीन कलमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये चित्रपटांचे अनधिकृत रेकॉर्डिंग (कलम 6AA) आणि त्यांचे प्रदर्शन (कलम 6AB) प्रतिबंधित करण्याची तरतूद आहे.

या विधेयकात कठोर अशा नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. 6AA अंतर्गत डिव्हाइसमध्ये चित्रपट किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या रेकॉर्डिंगवर बंदी घालते.

Piracy Bill in Rajysabha
10 Free Web Series : या 10 वेबसिरीज तुम्ही विनामुल्य पाहु शकता... जाणुन घ्या कुठे आणि कशा...

अनुराग ठाकूर म्हणाले

कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारताव्यतिरिक्त जगभरातील कलाकारांसाठी पायरसी हे मोठे आव्हान आहे.

उत्कृष्ट सिनेमा तयार करण्यासाठी एक मोठी टीम लागते.

दुर्दैवाने अनेक वेळा पायरसीमुळे त्यांची मेहनत वाया जाते. यामुळे चित्रपटसृष्टीचे करोडोंचे नुकसान होते.

पायरसीमुळे चित्रपटसृष्टीला होणारे 20,000 कोटी रुपयांचे नुकसान दूर करण्यासाठी सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक आणण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com