आपल्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टींना उजाळा देण्याची आणि नजरेच्या पल्याड असलेल्या अदृश्याचा वेध घेण्याची संधी आपल्याला चित्रपटांमुळे मिळाली, असे जपानी चित्रपट (Films) निर्देशक मासाकाझू कानेको (Masakazu Kaneko) सांगतात. 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांत (International competition) मासाकाझू कानेको यांचा ‘रिंग्स वान्डरिंग’ हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात प्रदर्शित करण्यात आला. खच्चून भरलेल्या आयनॉक्सच्या प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त अशी दादही दिली.
नजरेपल्याड दाखविण्याचा प्रयत्न जपानच्या राजधानीबद्दल मासाकाझू सांगतात की, जरी बाह्यात्कारी टोकियोला आधुनिक गजबजाटी शहर म्हणून ओळखले जात असले, तरी शहरात अनेक अप्रकाशित ठिकाणे आहेत, त्यांचा जुना चेहरा जपून ठेवत आहेत. हे जे नजरेपल्याड आहे, ते त्यांनी आपल्या चित्रपटातून दाखवायचा यत्न केलाय. काय म्हणतात मासाकाझू
‘मी टोकियोत (Tokyo) जन्मलो आणि वाढलो. काही वर्षांपूर्वी त्या शहराने बांधकाम क्षेत्राचा स्फोट अनुभवला. 2020 च्या ऑलिंपिक्स स्पर्धांचे आयोजन आम्हाला मिळाले होते. आता शहरात सर्वत्र गगनचुंबी इमारतीच दिसतात. मला चित्रपटातून दाखवायचेय की, या शहराला अनेक मृतात्म्यांचे आशीर्वाद लाभले आहेत. 1945 च्या महायुद्धात येथे बॉम्बवर्षाव करून एक लाख लोकांना मारले गेले. त्यांचे आत्मे अजूनही भटकत असल्याचे मला चित्रपटातून सूचवायचे आहे. भूतकाळाच्या साहाय्याने चित्रपटाच्या नायकाला स्वप्नपूर्तीसाठी भूतकाळ विसरू नका, त्याचा आदर करा, हाच संदेश मला यातून द्यायचा आहे.
हा चित्रपट एका ‘मंगा’ कलाकारांवर बेतलेला आहे. एका बांधकामावर मंजुरी करणारा हा कलाकार काहीतरी नेत्रदीपक करण्याची स्वप्ने पाहतो आहे. सोसुके नावाचा हा कलाकार, त्याने जी चित्रकथा तयार केलीय, त्यात एक शिकारी आणि नामशेष होत असलेल्या प्रजातीतला एक लांडगा आहे. सोसुके कथाविस्तार करत अशा जागी येऊन पोहोचलाय, जेथून कथा पुढे नेणे त्याला जमत नाही. तितक्यात बांधकामासाठी खोदकाम करताना त्याला एका जनावराची कवटी सापडते. रिंग्स वांडरिंग हे चित्रपटाचे नावही श्लेषयुक्त आहे. मासाकाझू कानेको सांगतात, की आपण जेव्हा उंच पर्वतराजींत असतो तेव्हा अनेकदा वाट चुकतो आणि नेमकी वाट मिळेपर्यंत वर्तुळाकार फिरत असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.